भुसावळ – अ.भा.लेवा पाटीदार युवक महासंघ व बहिणाई ब्रिगेड तर्फे लेवा पाटीदार समाजातील विवाहेच्छुक युवक-युवतींचे परिचय संमेलन 5 जानेवारी रविवार रोजी सकाळी 11 वाजता संतोषीमाता हॉल भुसावळ येथे संपन्न झाला.यावेळी शैक्षणिक व कौटुंबिक माहिती असलेल्या परिचय सूचीचे व सौ.प्रा.सुनीता येवले यांच्या दोन काव्यसंग्रालयाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. तसेच बहिणाई ब्रिग्रेड भुसावळ या शाखेची घोषणा करून अध्यक्ष पद हे सौ मनिषा पाटील यांना सोपविण्यात आले कार्यक्रमाचे प्रास्ताविक ॲड.प्रकाशराव पाटील यांनी केले. तसेच क्रीडा मंत्री रक्षा ताई यांचे स्वागत सौ स्वाती भोळे यांनी केले .


रक्षा ताईंनी शेतकरी कुटुंबातील स्थळांना नकार न देता ते जोड धंदा करून नोकरदार व्यक्ती पेक्षा पण त्यांची आर्थिक बाजू कशी व किती भक्कम असते हे समजावून सांगितले
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार एकनाथराव खडसे होते, या प्रसंगी केंद्रीय क्रीडा मंत्री रक्षाताई खडसे यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले व वस्त्रोद्योग मंत्री संजयभाऊ सावकारे, यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला तसेच त्यांनी कार्यक्रमाला मान दिला म्हणुन आभार व्यक्त केले.

सदर कार्यक्रमांस कुटुंब प्रमुख ललित दादा पाटील, मा.नगराध्यक्ष उमेश नेमाडे,वासुभाऊ इंगळे,केंद्रीय अध्यक्ष ॲड.प्रकाशराव पाटील, उपाध्यक्ष राजेश सुधाकर चौधरी, शहराध्यक्ष देवेंद्र वणी,प्रदीप भोळे,बहिणाबाई ब्रिगेड अध्यक्ष आशाताई कोल्हे,सौ.स्वाती भोळे,मधुकर सरोदे,जगन्नाथ किनगे व समाजातील इतर मान्यवर व्यापीठावर उपस्थित ,शुभम पाटील व कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रा. मुकेश चौधरी यांनी केले.
तसेच सामुहीक विवाह जळगाव येथे घेण्याची घोषणा करण्यात आली व विवाह इच्छूक तरुण तरुणींना नाव नोंदविण्याचे आव्हान करण्यात आले



