‘गण गण गणात बाेते’ च्या गजरात शेगांव पालखीचे प्रस्थान

भुसावळ : येथिल जामनेर रोडवरील श्री गजानन महाराज देवस्थान तर्फे शनिवारी भुसावळ ते श्री क्षेत्र शेगांव पालखीचे प्रस्थान ‘गण गण गणात बाेते’च्या गजरात सकाळी ६ वाजता उत्साहात झाले.


प्रारंभी श्रींचे स्नान अभिषेक पूजा झाली. तद्नंतर पायी वारीस प्रारंभ झाला असता जामनेर राेडवर भक्तीचा मळा फुलल्याचे दिसून आले. दरम्यान दि. ८ राेजी पालखी शेगांव ला पाेहाेचेल.