पंचायत समिती भुसावळ व क्रीडा महासंघाकडून भास्कर चिमणकर यांचा सत्कार .

भुसावळ – पंचायत समिती भुसावळ येथील शिक्षण विभाग येथे दहा वर्षापासून सहाय्यक पदावर कार्यरत असलेले भास्कर रामदास चिमणकर त्यांची कनिष्ठ प्रशासन अधिकारी पदी पदोन्नती झाली . त्यांनी पंचायत समीती यावल येथे दिनांक १ जानेवारी २०२५ रोजी कनिष्ठ प्रशासन अधिकारी पदाचा परभार स्विकारला. त्या बद्दल महाराष्ट्र राज्य क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघ व पंचायत समिती शिक्षण विभाग भुसावळ यांच्या तर्फे अभिनंदन करून त्यांचा शाल व बुके देऊन सत्कार करण्यात आला.

प्रसंगी पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी किशोर वायकोळे. शा.पो.आ. अधीक्षक अजित तडवी, महाराष्ट्र राज्य शिक्षक महासंघाचे राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष डॉ. प्रदीप साखरे यांच्यासह बी.आर.सी.तील सर्व तज्ञ शिक्षक कर्मचारी उपस्थित होते. तेव्हा त्यांच्या उत्कृष्ट कार्याबद्दल सर्व अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी गुणगान गायले. व यापुढे सुद्धा भुसावळ पंचायत समिती शिक्षण विभागास आपली मदत लागल्यास आपण ती करावी अशी अपेक्षा करण्यात आली. प्रसंगी भास्कर चिमणकर यांनी सुद्धा सहकार्य करणार असल्याची ग्वाही दिली .