केसेस धारकांना न्यायालय ठोठावू शकतो १० हजार रुपयांचा दंड

जळगाव ( प्रतिनिधी ) – सरत्या वर्षाला निरोप व नव वर्षाच्या स्वागतासाठी तरुणाई मध्ये मोठ्या प्रमाणात उत्साहाचे वातावरण निर्माण होते . व अशा उत्साहाच्या वातावरणात तरुणाई मद्याच्या नशेत आपल्या ताब्यातील वाहने सुसाट पळवतात आणि अपघाताला कारणीभूत ठरतात . यामुळे पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून ठिकठिकाणी नाकेबंदी करण्यात आली होती . या नाकेबंदीत मद्य प्राशन करून वाहन चालविणाऱ्या १५० जणांवर पोलीसांनी कारवाई केली .
सरत्या वर्षाला निरोप व नव वर्षाच्या स्वागतासाठी तरुणाई मध्ये मोठ्या प्रमाणात उत्साहाचे वातावरण निर्माण होते . मात्र, अशा उत्साही वातावरणात तरुणाई मोठ्या प्रमाणावर मद्यप्राशन करून वाहने चालवतात व आपल्या किंवा दुसऱ्याच्या अपघाताला कारणीभूत ठरतात . यामुळे अशा घटना टाळण्यासाठी जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ . महेश्वर रेड्डी यांच्या आदेशानुसार पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून जिल्ह्यासह जळगाव शहरात ठिक ठिकाणी नाकेबंदी करण्यात आली होती . यामध्ये पोलीसांनी रात्री वाहन धारकांची तपासणी केली असता १५० वाहनधारक ड्रंक ॲन्ड ड्राईव्ह करतांना आढळून आल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली . या सर्वांना न्यायालयात हजर केले जाणार असून न्यायालय अशा वाहन धारकांना किमान दहा हजार रुपयांचा दंड ठोठावू शकले असते असे वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी सांगितले .


