भुसावळ प्रतिनिधी ( दि १/१/२०२५ ) – येथील राजश्री संघमित्रा महिला सामाजिक बहुउद्देशीय फाउंडेशन भुसावळ तर्फे आयोजित क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १४६ व्या जयंती सन्मानार्थ शैक्षणिक उपक्रम राबवण्यात येत आहे यानिमित्त दिनांक 3 जानेवारी 2025 रोजी सकाळी 11 .30 वाजेला स्थानिक शहर पोलीस स्टेशन जवळ जुने प्रांत कार्यालय समोर फाउंडेशनच्या माध्यमातून शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येत आहे यासाठी संस्थेच्यावतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे .

फाउंडेशनच्या माध्यमातून गरजवंत , होतकरु (इयत्ता पाचवी ते इयत्ता दहावी ) मध्ये शिक्षण घेत असलेले विद्यार्थी यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी अवनी दत्तक योजनेच्या माध्यमातून एक वर्षासाठी 40 विद्यार्थ्यांना वर्षभरासाठी लागणारे शैक्षणिक साहित्य दिले जात असते .
या अभिवादन स्वरूपात शैक्षणिक साहित्य संकलन निमित्त आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णांत पिंगळे , व प्रतिष्ठा महिला मंडळ अध्यक्षा रजनीताई सावकारे हे उपस्थित राहणार आहेत तर प्रमुख पाहुणे म्हणून शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उद्धव दमाडे , बाजारपेठ पो स्टे चे पोलीस निरीक्षक राहुल वाघ , तालुका पो स्टे चे पोलीस निरीक्षक महेश गायकवाड , सक्षम नारी फाउंडेशन अध्यक्षा डॉ. सुवर्णा गाडेकर , दैनिक सामना तालुका प्रतिनिधी उज्वला बागुल , अँड. प्रिया अडकमोल , शहर पत्रकार संघ अध्यक्ष प्रेम परदेशी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे
कार्यक्रमास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून तसेच शैक्षणिक साहित्य देऊन संस्थेस हातभार लावावा असे आवाहन संस्था अध्यक्ष राजश्री सुरवाडे व फाउंडेशनच्या सर्व महिला पदाधिकारी यांनी केले आहे .


