भुसावळ – येथील तहसीलदार कार्यालयात आज राष्ट्रीय ग्राहक दिन संपन्न झाला.प्रमुख वक्ते ,जिल्हा ग्राहक संरक्षण परिषद,दक्षता समिती व ग्राहक पंचायत जळगाव माजी जिल्हाध्यक्ष प्र. ह.दलाल सर होते . यावेळी तहसीलदार नीता मॅडम यांनी पुष्पगुच्छ देवून दलाल सर यांचा सत्कार केला .

याप्रसंगी बोलताना प्र ह दलाल यांनी म्हटले की ग्रहाकदिन केवळ औपचारिक पद्धतीने साजरा न करता शाळा महाविद्यालयात व्हावा कारण एक विद्यार्थी जागृत झाला तर एक कुटुंब जागृत होवू शकते आज अनेक प्रकारे ग्राहकांची लुबाडणूक व फसवणूक होते पण ग्राहक तक्रार करीत नाही हे असेच चालणार,तक्रारींचा उपयोग होत नाही उगाच वाईटपणा का घ्यावा ह्या मानसिकतेतून तो बाहेर यायला हवा त्यासाठी मोठ्याप्रमाणावर प्रबोधन होणे गरजेचे आहे सेल,अथवा एकावर एक फ्री अश्या प्रलोभनाला बळी पडू नये शासकीय अधिकाऱ्यांनी सुद्धा ठराविक साचेबंद पद्धतीने असे कार्यक्रम न करता जनजागृती हे ध्येय ठेवले तर ह्या दिवसाचे खरे औचित्य,खरा हेतू साध्य होईल असेही दलाल सर यावेळी म्हणाले .
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तहसीलदार नीता लबडे या होत्या सूत्रसंचालन व प्रास्ताविक पुरवठा निरीक्षक रोशनी मॅडम यांनी केले नायब तहसीलदार घुले मॅडम व्यासपीठावर होत्या त्यांनी आभार प्रदर्शन केले. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप्रज्वलन झाले


