भुसावळ – जिल्हाधिकारी याच्या अध्यक्षतेखाली झालेल्या गुणवत्ता कक्ष व सुकाणू समितीच्या बैठकीत मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिलेल्या सुचनेनुसार भुसावळ तालुक्यातील जि.प. व न.पा. खाजगी प्राथमिक व माध्यमिक अनुदानित व विनाअनुदानित इ. 5 वीव इयत्ता8 वी शिष्यवृत्ती परीक्षा कार्यशाळेचे आयोजन दिनांक दिनांक 24 डिसेंबर 2024 रोजी म्युनिसिपल हायस्कूल भुसावळ येथे सकाळी 11 ते संध्याकाळी 5 वाजे पर्यत करण्यात आले होते. त्यात इयत्ता 5 वी आणि 8 वी ला शिकविणारे जवळजवळ 100 शिक्षक शिक्षिका उपस्थित होत्या.

सदर कार्यशाळेत शिष्यवृत्ती परीक्षा स्वरूप: या विषयावर रवींद्र बहाडे जि प शाळा जाटगाव, मराठी विषयाबद्दल शैलेंद्र पाटील.के.नारखेडे विद्यालय,भुसावळ. व श्रीमती. निलांबरी झांबरे भुसावळ हायस्कूल भुसावळ., गणित विषयासाठी : सचिन मधुकर माळी. महात्मा गांधी विद्यालय वरणगाव.
., बुद्धिमत्ता या विषयासाठी : भूषण भंडारी, अहिल्यादेवी कन्या विद्यालय भुसावळ., इंग्रजी विषयासाठी : प्रशांत अरुण ढाके.पंडित नेहरू विद्यालय वराडशिम. शिष्यवृत्ती नियोजन: यासाठी रवींद्र बहाडे जि प शाळा जाडगाव इत्यादी तज्ञ शिक्षकांनी मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला म्युनिसिपल हायस्कूल भुसावळचे मुख्याध्यापक सुभाष जी.मेढे. यांनी गटशिक्षणाधिकारी किशोर वायकोळे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तसेच म्युनिसिपल शाळेच्या ज्येष्ठ शिक्षिका श्रीमती सरला सावकारे यांनी विस्तार अधिकारी बी. डी.धाडी यांचा व महाराष्ट्र क्रीडा व शारिरीक शिक्षण व शिक्षक महासंघाचे राज्य उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष डॉ. प्रदीप साखरे यांनी गटसाधन केंद्राचे संजय गायकवाड , देवानंद वाघदरे ,केंद्रप्रमुखआशिक शेख, यांचा. पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला

. तसेच तज्ञ मार्गदर्शक यांचे एस.टी चौधरी, नरेंद्र राठोड, डी.के भंगाळे, मनोज किरंगे, प्रवीण चौधरी, नाना पाटील, निलेश बोराडे, जे.पी. शिरतुरे, लक्ष्मण पवार इत्यादी शिक्षकांनी सत्कार केले. गटशिक्षणाधिकारी श्री किशोर वायकोळे यांनी विस्तार अधिकारी श्री बी .डी.धाडी यांनी कार्यशाळेस सविस्तर मार्गदर्शन केले.

कार्यशाळेचे सूत्रसंचालन शैलेंद्र महाजन के नारखेडे विद्यालय भुसावळ यांनी केले. तालुक्यातील जवळजवळ शंभर शिक्षक शिक्षिका कार्य शाळेसाठी उपस्थित होत्या .



