भुसावळात गिरनारी मठात अनघाष्टमीनिमित्त साकारली आरास :

भुसावळ – शहरानजीकच्या शिवपूर-कन्हाळे रस्त्यावर श्री दत्त गिरनारी मठाची उभारणी करण्यात आली आहे. जिल्हाभरातून आलेल्या भाविकांनी साेमवारी अनघाष्टमी व्रताच्या निमित्ताने मठात अनघालक्ष्मी व दत्तप्रभू यांची जी आरास साकारली हाेती त्याचे दर्शन घेतले. आरती. पूजाविधी असे विविध असे कार्यक्रम स्वामी ब्रह्मानंद यांच्या उपस्थितीत झाले.