नाताळ आणि हिवाळी सुट्यांमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन नासिक ते धनबाद आणि रिवा ते मडगांव दरम्यान अतिरिक्त विशेष गाड्या चालवणार आहे. तपशील खालीलप्रमाणे आहेतः –

१) नाशिक – धनबाद गरीबरथ विशेष गाडी (०८ सेवा)
गाडी क्रमांक ०३३९८ गरीबरथ विशेष दिनांक २२.१२.२४ ते ०२.०१.२५ पर्यंत प्रत्येक गुरुवार आणि रविवार रोजी नाशिक येथून ०८.५५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी धनबाद येथे २१.०० वाजता पोहचेल.
गाडी क्रमांक ०३३९७ गरीबरथ विशेष दिनांक २०.१२.२४ ते ३१.१२.२४ पर्यंत प्रत्येक मंगळवार आणि शुक्रवार रोजी धनबाद येथून २३.०० वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी नाशिक येथे ०७.०० वाजता पोहचेल.
थांबे -: मनमाड, जळगांव, भुसावळ, खंडवा, इटारसी, जबळपूर, न्यू कटनी, सिंगरुळी, चोपण, रेनूकूट, गरवा रोड, डाल्टनगंज, बरवाडीह, लतेहार, टोरी, खलारी, पत्रातू, बरका काना, रांची रोड, गुमिया, बोकारो, चंद्रपूरा, कत्रासगढ.
सरंचना -: २० तृतीय वातानुकूलित, १ लगेज कम गार्डची ब्रेक व्हॅन आणि १ जनरेटर व्हॅन.
२) रिवा – मडगांव विशेष गाडी (०४ सेवा)
गाडी क्रमांक ०१७०३ विशेष दिनांक २२.१२.२४ आणि २९.१२.२४ रोजी रिवा येथून १२.०० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी मडगांव येथे २१.२५ वाजता पोहचेल.
गाडी क्रमांक ०१७०४ विशेष दिनांक २३.१२.२४ आणि ३०.१२.२४ रोजी मडगांव येथून २२.२५ वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी रिवा येथे ०८.२० वाजता पोहचेल.
थांबे-: सतना, मैहर, कटनी, नरसिंगपूर, पिपरिया, इटारसी, हरदा, खंडवा, भुसावल, जळगांव, मनमाड, नाशिक, कल्याण, पनवेल, रोहा, चिपलून, रत्नागिरी, कंकावली, कुडाल, सावंतवाड़ी रोड ,थिविम आणि करमाळी.
संरचना : एक प्रथम वातानुकूलित, एक द्वितीय वातानुकूलित, ५ तृतीय वातानुकूलित, ११ शयनयान, ४ सामान्य द्वितीय श्रेणी, २ लगेज कम गार्ड्स ब्रेक व्हॅन.
या विशेष गाड्यांच्या तपशीलवार वेळा आणि थांब्यांसाठी, कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस ॲप डाउनलोड करा.


