भुसावळ – भुसावळकडून वरणगावकडे निघालेल्या कारला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने कार चालकाशेजारील हिरामण कारभारी धात्रक (44, रा.उंबराणे, ता.दिंडोरी, जि.नाशिक) यांचा मृत्यू ओढवला तर नरेंद्र दत्तात्रय मुळे (नाशिक) व चालक विजय देवराम कोळी (नाशिक) जखमी झाले.
हा अपघात राष्ट्रीय महामार्गावरील दीपनगर प्रकल्पाजवळ मंगळवारी रात्री 11.30 वाजेच्या सुमारास घडला. नाशिक जिल्ह्यातील तिघे भुसावळकडून वरणगावच्या दिशेने गुजरात पासिंगच्या कारने निघाल्यानंतर त्यांच्या वाहनाला अज्ञात वाहनाने धडक दिल्याने एकाचा मृत्यू झाला तर दोघा जखमींवर खाजगीत उपचार सुरू आहेत.



