पाचोरा – शहरातील रेल्वे स्टेशन जवळ नगरपालिकेच्या समोर भारत मशनरीच्या बाजूला असलेल्या रामराव पाटील यांच्या धरती धन कृषी केंद्राल आज सायंकाळी सव्वासात ते साडेसात वाजेच्या दरम्यान अचानक आग लागल्याची घटना घडली आहे. आग लागली तेव्हा धरती धन हे कृषी केंद्र बंद होते अशी माहिती समोर येत असून आग लागल्याचे लक्षात येताच परिसरातील दुकानदारांनी अग्निशमन दलाला कळवले अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळेवर येऊन आग आटोक्यात आणली म्हणून पुढील अनर्थ टळला मात्र आग मोठ्या प्रमाणात असल्याने आसपासच्या दुकानदारांची धावपळ सुरू झाली होती दरम्यान ही आग कश्यामुळे लागली हे स्पष्ट झालेले नाही.



