भुसावळ – येथील शिवपूर-कन्हाळे रस्त्यावर श्रीदत्त गिरनारी मठात श्रीदत्त जयंती उत्सव साजरा केला जातो आहे. गुरूचरित्रावरील 46व्या अध्यायात श्री गुरुंनी दीपावलीच्या दिवशी एकाचवेळी अनेक भक्तांनी घरी पूजेचा स्वीकार केल्याचे वर्णन आहे. या आशयावरील आरास गुरूवारी मठात साकारण्यात आली.



