भुसावळ – भुसावळच्या राजकारणात सलग चौथ्यांदा विधानसभा निवडणुकीत निर्विवाद वर्चस्व मिळवणार्या आमदार संजय सावकारे यांचा बुधवार, 11 रोजी वाढदिवस असल्याने त्यांचा नागरि सत्कार शहरातील प्रोफेसर कॉलनीतील बियाणी स्कूलच्या प्रांगणात सायंकाळी साडेपाच वाजता करण्यात येणार आहे.

आमदारांचा सन्मान
विधानसभा निवडणुकीत सलग चौथ्यांदा भरघोस मतांनी विजयी झालेल्या आमदार संजय सावकारे यांचा 11 डिसेंबर रोजी वाढदिवस असल्याने या दिवसाचे औचित्य साधून आमदार संजयभाऊ सावकारे मित्र परिवारातर्फे त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. शहरातील नागरिकांनी या कार्यक्रमास उपस्थिती द्यावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
महायुतीतील विजयी आमदारांचाही होणार सन्मान
जळगाव जिल्ह्यातील 11 मतदारसंघातून सर्वच महायुतीचे उमेदवार विजयी झाल्याने सर्व आमदारांनाही या कार्यक्रमात निमंत्रीत करण्यात आले असून त्यांचादेखील सहृदय सन्मान यावेळी केला जाणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.


