प्रेमसंबंध न ठेवल्यास फोटो व्हायरल करण्याची धमकी देत विनयभंग -एकाला अटक ;


जळगाव – माझ्यासोबत प्रेमसंबंध ठेवले नाही तर सोबत काढलेले फोटो व व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीचा विनयभंग एका तरुणाने केला. ही घटना दि. ४ डिसेंबर रोजी घडली. याप्रकरणी तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला जळगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनकडून अटक करण्यात आली आहे.

एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका परिसरात १७ वर्षीय मुलगी वास्तव्यास आहे. दि. ४ डिसेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास कामेश उर्फ कमलेश विनोद चरखे (रा. सुप्रीम कॉलनी) याने तिला धमकी दिली. यावेळी त्याने तू माझ्यासोबत प्रेमसंबंध ठेवले नाही तर सोबत काढलेले फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करेल अशी धमकी देत मुलीचा विनयभंग केला.

याप्रकरणी मुलीने एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक माधुरी बोरसे करीत आहेत.