भुसावळात अवैध गौण खनिज वाहनावर कारवाई –


भुसावळ – महसूल विभागाचे पथकाने दिनांक .४ डिसेंबर रोजी राष्ट्रीय महामार्ग ५३ वर एका अवैध गौण खनिज वाहनांवर कारवाई केली आहे.

अवैध गौण खनिज व अवैध वाळूची वाहतूक बेधडकरीत्या .सुरू असल्याची माहितीमिळाल्यावरून या वाहनांवर उपविभागीय अधिकारी जितेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल पथकाने राष्ट्रीय महामार्ग ५३ वर दुपारी अवैध गौण खनिज वाहतूक करणारे वाहनावर कारवाई केली सदर वाहन मौजे साकेगाव येथील रहिवाशी संदीप बेनीलाल परदेशी यांचे मालकीचे वाहन क्रमांक (एम.एच १८ डी ७७५२) ता.४ डिसेंबर रोजी ताब्यात घेऊन तहसील कार्यालयात पुढील दंडात्मक कार्यवाही करता जमा केले.

या कार्यवाहीत महसूल विभागाचे मंडळ अधिकारी प्रफुल कांबळे , भुसावळ तलाठी पवन नवगाळे हे होते.