वरणगावातील वासुदेव नेत्रालयाची मतदार जनजागृती अभियानास मुदतवाढ –

वरणगाव : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढवा तसेच आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्यासाठी प्रत्येक मतदाराला मतदान करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे या हेतूने वरणगाव शहरातील वासुदेव नेत्रालयाचे नेत्र तज्ञ डॉ.रेणुका पाटील आणि डॉ.नितु पाटील यांनी 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर या काळात मतदार जनजागृती अभियान यशस्वीपणे राबविले.

बोटावरील शाई दाखवल्यास सवलत
मतदान करण्यासाठी मतदारांना 1 नोव्हेंबरपासून सवलत देण्यास सुरवात झाली होती तसेच मतदान झाल्यावर देखील पुढील 30 नोव्हेंबरपर्यंत नेत्रतपासणी फी सवलत देण्यात आली. मतदारांचा उत्साह पाहता आणि अभियानाला मिळालेला अभूतपूर्व प्रतिसाद पाहता तसेच नेत्ररुग्णांच्या विशेष मागणीवरून हे अभियान 21 डिसेंबरपर्यंत सुरू राहणार आहे.म तदारांनी मतदान केल्यावर पुरावा म्हणून केवळ बोटावरील शाई दाखवल्यास सदर सवलतीचा फायदा घेता येईल, असे डॉ.नितु पाटील कळवतात.