शिरपूर तालुक्यातील तरुणीवर लग्नाच्या आमिषाने अत्याचार : चोपडा पोलिसात पाच जणांविरोधात गुन्हा –

चोपडा – लग्न करण्याचे आमिष दाखवत 21 वर्षीय तरुणीवर अत्याचार केल्याची करण्यात आला. याप्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात पाच जणांना विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील एका गावात 21 वर्षीय तरुणी आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. संशयीत आशिष समाधान सपकाळे (22, चोपडा तालुका) याने तरुणीला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर 21 ऑक्टोबर 2022 रोजी अत्याचार केला. त्यानंतर दुसर्‍यांदा 23 जानेवारी 2019 रोजी देखील शिरपूर रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये तिला बोलून अश्लील व्हिडिओ काढला व तिच्यावर अत्याचार केला.

या प्रकरणात संशयित आरोपी आशिष सपकाळे याचे मित्र प्रशांत पाटील आणि त्याचे नातेवाईक समाधान भाईदास सपकाळे, रवींद्र निंबा कोळी आणि अलकाबाई समाधान कोळी यांनी सहकार्य केले.

दरम्यान तरुणीने लग्नासाठी तगादा लावला असता संशयित आरोपी अशी सपकाळे याने धमकी दिली. दरम्यान तरुणीने अखेर शुक्रवार, 29 नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता चोपडा शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार चोपडा पोलीस ठाण्यात पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश्वर हिरे करीत आहे.