अल्पवयीन मुलीवर अत्याचार ; पीडिता सहा महिन्यांची गर्भवती ; तरुणावर गुन्हा दाखल ;

वरणगाव –

भुसावळ तालुक्यात एका चौदा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी तरुणाविरोधात पोस्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वरणगाव तालुक्यातील एका गावात आपल्या घरात मुलगी अंगावरचे कपडे बदलवत असताना सदर मुलीच्या आईला मुलीचे पोट मोठे दिसल्याने तीच्या आईने तिला विश्वासात घेऊन तिच्याकडे विचारपुस केल्यानंतर मुलीने घडलेला प्रकार सांगितला. यामुळे आईला धक्काच बसला.

मुलीच्या पोटात सहा महिन्याचा गर्भ असल्याचे मुलीने सांगितले. तर पिडीत मुलीने सदर घटनेबाबात हकीकत सांगीतल्या नुसार घरा शेजारी राहणारा निलेश संजु निळे या तरुणाने सात महिन्यापूर्वी त्याच्या घरात मला जबरजस्तीने घरात नेऊन अत्याचार केला. त्या नंतर पुन्हा दि. ५ /९ /२०२४ रोजी घरात बोलावून अत्याचार केल्याची हकीकत पीडित मुलीने तीच्या आईला सांगितल्याने ही घटना उघडकीस आली.

याप्रकरणी वरणगाव पोलीस स्टेशनला पिडीत मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून निलेश संजु निळे याच्या विरोधात भारतीय न्यायसहिताच्या कलम ६४ (२) (एम) ३५१ ‘ (१) (२) पोस्को कायद्याचे ४, ६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा पुढील तपास सह पोलीस निरिक्षक सुशिल सोनवणे हे करीत आहे.