बोदवड प्रतिनिधी – येथील बोदवड एज्युकेशन सोसायटीचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, विद्यार्थी विकास कक्ष, बोदवड आणि कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र, विद्यापीठ, विद्यार्थी विकास विभाग, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने राबविल्या जाणाऱ्या महिला आरोग्य संवर्धन ऋतुमती अभियान अंतर्गत प्रथम कार्यक्रम हिमोग्लोबिन/ सीबीसी चाचणी शिबिराचे आयोजनाच्या माध्यमातून दिनांक 27 सप्टेंबर 2024 रोजी महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक अरविंद चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले.
सदर शिबिराचे प्रास्ताविक विद्यार्थी विकास अधिकारी, डॉ. अजय पाटील यांनी महिला आरोग्य संवर्धन ऋतुमती अभियान अंतर्गत वर्षभर राबविल्या जाणाऱ्या कार्यक्रमांची कल्पना उपस्थित विद्यार्थिनींना दिली आणि हिमोग्लोबिन/ सीबीसी चाचणीचे महत्त्व देखील समजावून सांगितले. सहाय्यक विद्यार्थी विकास अधिकारी, डॉ. मनोज निकाळजे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर महिला विद्यार्थी विकास अधिकारी, डॉ. रूपाली तायडे यांनी आभार प्रदर्शन केले.
या अभियानामध्ये महाविद्यालयातील एकूण 60 विद्यार्थिनींचे हिमोग्लोबिन/ सीबीसी चाचणी करण्यात आली. याकरिता बोदवड येथील नामांकित संजीवनी क्लीनिकल लॅब, स्टेशन रोड, बोदवड येथून डॉ. संजय भालेराव आणि त्यांचे सहकारी सुशील बोदडे व सौरभ सावकारे उपस्थित होते.
शिबिर यशस्वीतेसाठी निकिता गोरे, आचल गायकवाड, नेहा शेळके, अंकिता उचांडे, पल्लवी हरणे, रेणुका चापोरकर, सपना इंगळे, मृणाली सिंगतकर,नेहा माळी, नम्रता चौधरी, मृणाल जैन, कांचन पाटील, पूजा बोदडे, इत्यादी विद्यार्थिनींनी सहकार्य केले.



