अमळनेर : पत्रकारांच्या न्याय हक्कासाठी लढणारी व्हॉइस ऑफ मीडियाचे उत्तर विभागीय अध्यक्ष तथा मंगळ ग्रह सेवा संस्था डॉ.दिगंबर महाले यांच्यावतीने श्री गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी गणेश मंडळ यांना कायदा व सुव्यवस्थाचे पालन करीत शिस्तबद्ध मिरवणुक काढणाऱ्या गणेश मंडळ अध्यक्ष यांचा प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला .

तसेच विसर्जन मिरवणुकीत मंगळग्रह सेवा संस्था व व्हॉईस ऑफ मीडियातर्फे अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांनी स्वतः गणपती विसर्जन साठी पोलीस कर्मचारीसह चोख बंदोबस्त ठेवला .
यावेळी मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील, माजी आमदार शिरीष चौधरी, उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉ. डिगंबर महाले, उपाध्यक्ष एस. एन. पाटील, खजिनदार गिरीश कुलकर्णी, सचिव सुरेश बाविस्कर, सहसचिव दिलीप बहिरम, विश्वस्त अनिल अहिरराव, प्रकाश मेखा, व्हि. व्हि. कुलकर्णी, भाजपा तालुकाध्यक्ष हिरालाल पाटील, खा.शि. मंडळ उपाध्यक्षा माधुरी पाटील, काँग्रेसच्या सुलोचना वाघ, माजी जि. प. सदस्य ॲड. व्हि. आर. पाटील, खा. शि. मंडळाचे संचालक योगेश मुंदडे, विनोद अग्रवाल, माजी उपनगराध्यक्ष लालचंद सैनानी, विजय माहेश्वरी, अर्बन बँकेचे संचालक प्रविण जैन, पंकज मुंदडे, निर्मला बडगुजर, विजय पवार, सुंदरपट्टीचे माजी सरपंच सुरेश पाटील या मान्यवरांनी भेटी देऊन पत्रकारांचे आभार मानले .
जिल्हा पोलीस अधीक्षक मल्लेश्वरी रेड्डी यांनी अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक कविता नेरकर व डी वाय एस पी सुनील नांदगावकर पोलीस निरीक्षक अमळनेर विकास देवरे व त्यांचे सहकारी कोणतेही अनुचित प्रकार घडू नये म्हणून बंदोबस्त ठेवला .


