मुंबई :
राज्यामध्ये एकीकडे करोनाची दहशत असतानाच दुसरीकडे कोकणातील सिंधुदुर्गमध्ये माकड तापाचे संकट आलं आहे. माकडवतापाने दोघांचा बळी घेतला आहे. दिनेश शांताराम देसाई (४५, रा. डेगवे – मोयझरवाडी) तर लक्ष्मण शिंदे (पडवे माजगाव) असे माकडतापाने बळी गेलेल्यांचे नाव आहे. दरम्यान, माकडतापाचे 3 महिन्यांत 18 रुग्ण आढळलेत.
या दोघांवरही गोवा बांबुळी रुग्णालयात उपचार सुरू होते. एका रुग्णाचा चार दिवसांपूर्वी उपचारादरम्यान तर एका रुग्णाचा काल रात्री मृत्यू झाला. त्यामुळे कोरोनासह आता नागरिकांमध्ये माकडतापाबाबतही भीती निर्माण झाली आहे. या आजाराने दोघांचा बळी घेतल्यानंतर दोडामार्ग तालुक्यातल्या 8 गावांमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे.
माकडतापाची लक्षणां मध्ये ताप, सांधेदुखी, अंगदुखी आणि अशक्तपणा अशी माकड तापाची प्राथमिक लक्षणे असून आजारामध्ये ताप गेला तरी सांधेदुखी कायम राहते.



