भुसावळ – येथील सोमाणी गार्डन परिसरातील भालचंद्र नगर मध्ये या वर्षी ही सालाबादप्रमाणे गणेश उत्सव घरगुती स्वरूपात अत्यंत उत्साहात साजरा करण्यात येत आहे. भालचंद्र नगर मध्ये साजऱ्या होणाऱ्या कोणत्याही घरगुती कार्यक्रमात सर्वांचा अत्यंत उत्साहात सहभाग असतो. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात सर्व कार्यक्रम पार पाडतात.
– या उत्सवाचे स्वरूप घरगुती असल्यामुळे भालचंद्र नगरचा राजा अर्थात येथील गणेश उत्सवात कोठलीही खूप खर्चिक आरास करण्यात आलेली नाही. अत्यंत साधेपणाने पण आकर्षक पद्धतीने व्यसनमुक्तीचे संदेश देणारे पोस्टर प्रदर्शनाची आरास या ठिकाणी करण्यात आलेली आहे. दररोज सकाळी आणि संध्याकाळी तेथे होणाऱ्या आरती दरम्यान प्रत्येक घरातील सदस्य उपस्थित असतात. तसेच रात्री दहा वाजेपर्यंत अनेक प्रबोधनाचे कार्यक्रम आणि मनोरंजनात्मक खेळ खेळले जात असतात या प्रसंगी त्या प्रदर्शनाचे अवलोकन होत असते. आणि त्या द्वारे व्यसनमुक्ती च्या संदर्भातील प्रबोधनाचे कार्य आणि चर्चांच्या माध्यमातून चिंतन ही होत असते. गणेश प्रतिमेच्या दर्शनी भागात नशाबंदी मंडळाचे मोठे बॅनर लावलेले असून प्रतिमेच्या पार्श्वभागात लावलेली व्यसनमुक्ती ची प्रदर्शनी नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे जळगाव जिल्हा संघटक प्रा डॉ दयाघन एस राणे यांनी उपलब्ध करून दिलेली आहे.


डॉ दयाघन राणे हे भालचंद्र नगरचे निवासी असून भालचंद्र नगरचा राजा च्या उत्सव समिती च्या समाज प्रबोधनाच्या संकल्पने मधून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
ह्या कार्यक्रमाचे आयोजनासाठी श्री. अशोक चौधरी यांच्या नेतृत्वात निखिल कोलते, श्री चंद्रकांत चौधरी, प्रा. डॉ. गजानन जाधव, तुषार चींधडे, श्री प्रमोद पाटील, श्री. बापू पाटील, पवन पाटील, जीवन पाटील, संदीप कोलते, दिलीप ढाकणे, श्री राजेश जोशी, श्री शिरीष पिंपळे यांसह प्रा आशिष महाजन, श्री विजय महाजन, श्री किशोर नारखेडे, श्री गाजरे, श्री अजय महाजन, श्री डी टी किरंगे आणि भालचंद्र नगर मधील कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.


