अमळनेरात खाटेश्वर महादेव मंदिरात प्रसादाची उसळली महागर्दी : व्यापारी वर्गांची आर्थिक मदत :

अमळनेर – .

येथील बहादरपूर रोड खाटेश्वर महादेव मंदिरा येथे नुकताच महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न झाला .यावेळी अलोट गर्दीत सुद्धा हजारो भाविक , शिवभक्त व महिलांसह परिसरातील नागरीकांनी प्रसादाचा लाभ घेतला

काटेश्वर महादेव मंदिराची आख्यायिका सांगितली जाते की या मंदिरात केलेला नवस त्वरित पूर्ण होतो येथील महादेव हे भक्तांना प्रसन्न झाले आहे यामुळे येथे मोठ्या प्रमाणात भंडारा महाप्रसाद वाटप होते श्रावण महिन्यात महाप्रसादाचा मोठा कार्यक्रम केला जातो

. या मंदिराची देखभाल मंदिराचे व्यवस्थापक सेवानिवृत्त शिक्षक सुखदेव धुडकू अहिरे करीत असून शिक्षकी पेशा व्यतिरिक्त ते त्यांचा उर्वरित वेळ महादेव मंदिराची सेवा करण्यात देतात तर मंदिराचे सदस्य यांच्या माध्यमातून ही सेवा करत असतात . मंदिराच्या सेवेसाठी व्यापारी अनमोल वेळ देऊन सेवा करत असतात

रस्त्याच्या दुरावस्थेमुळे यंदा अनेक भाविकांना दर्शन न झाल्याने नाराज झाले खाटेश्वर मंदिराच्या बाजूला समोरील रस्ते हे बरोबर नसल्या कारणामुळे काही भक्त दर्शनाला व प्रसादाला येवू शकले नाही भाविकांनी नाराजी व्यक्त करीत लवकरात लवकर रस्ते दुरुस्ती करावी अशी मागणी केली आहे . कार्यक्रम यशस्वीतेसाठी अध्यक्ष व व्यवस्थापक तसेच सेवेकरी सुखदेव धुडकू अहिरे , सोहम मंडप , अनिल चौधरी , प्रवीण महाजन , महाजन मेडिकल बटू चौधरी , दिलीप भगतराव महाजन , भावेश महाजन ,श्रीराम बापू अरुण महाजन ,सोनू चौधरी , प्रसाद पोतदार, श्रावण कंजर संदेश भोई संजू सिंगाने यांच्यासह भाविकांनी परिश्रम घेतले .तर
कार्यक्रमाला उपस्थित असलेले सामाजिक कार्यकर्ता यांचेही अनमोल सहकार्य असते