मानवतकर बहुउद्देशिय संस्था पर्यावरण जागर प्रतिष्ठान व हरीत शहर स्वच्छ शहर तर्फे गणेश मंडळासाठी विविध पारितोषिके मिळणार !

भुसावळ

भुसावळ शहरातील सांस्कृतिक वारसा सातत्याने चालावा लोकमान्य टिळक यांना अपेक्षित असलेला गणराया उत्सव साजरी व्हावा व अधिकाअधिक आपल्या परंपरेचा वापर व्हावा विविध सामाजिक उपक्रम राबवावे यासाठी गणेश मंडळांनी केलेल्या भव्य सजावट , आकर्षक मुर्ती , सामाजिक संदेश देणारा देखावा , जणजागृती पर कार्यकमाचे आयोजन, गणराया मिरवणुकीत भारतीय परंपराची जपवणूक , वाद्यांचा वापर, शिस्तबद्ध मिरवणूक, सामाजिक उपक्रम अश्या विविध विषयावर विविध पारितोषिके ठेवलेली असून गणेश मंडळाचे याबाबत मान्यवराकडून परिक्षण करण्यात येणार आहे . असे गणेश मंडळासाठी पारितोषिके जाहीर करणारे मानवतकर बहुउद्देशिय संस्था , भुसावळ पर्यावरण जागर प्रतिष्ठान व हरीत शहर स्वच्छ शहर भुसावळ शहर च्या वतीने याबाबत अधिक माहितीसाठी 9175459115 या मोबाईल नंबर वर संपर्क करावा . असे आवाहन आयोजित समिती च्या वतीने केले आहे