गाडगेबाबा अभियांत्रिकीच्या १० विद्यार्थ्यांची हायटेक नेक्स्ट टेलिकॉम प्रा.लि. मध्ये निवड

भुसावळ (प्रतिनिधी )-
येथील हिंदी सेवा मंडळ संचालित श्री संत गाडगेबाबा अभियांत्रिकीमध्ये शनिवार, दिनांक १४ मार्च रोजी कॅम्पस ड्राईव्ह संपन्न झाला. हायटेक नेक्स्ट टेलिकॉम प्रा.लि. कलकत्ता या कंपनीने मुलाखती घेतल्या.
अभियोग्यता व कल चाचणी नंतर निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या कंपनीचे एच आर मॅनेजर मोहित चोक्रोवती, एस नॅनडी यांनी मुलाखती घेतल्या. मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल व इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकॉम विभागाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
२० हजार मासिक उत्पन्न असलेल्या यापैकी १० विद्यार्थ्यांची हायटेक नेक्स्ट टेलिकॉम प्रा.लि. मध्ये निवड करण्यात आली अशी घोषणा मोहित चोक्रोवती यांनी केली. सुरज पाटील, रोहित वारके, आकाश शर्मा, चैतन्य देशमुख, आकाश बेंबरे, मनीष लोखंडे, ललित कापडे, रोहन मराठे, अभिषेक वागुळे, प्रभात देवरे या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
हिंदी सेवा मंडळाचे अध्यक्ष जे.टी. अग्रवाल, सचिव मधुलता शर्मा, कोषध्यक्ष ऍड. महेशदत्त तिवारी व सर्व मंडळ पदाधिकारी तसेच प्राचार्य डॉ.आर.पी.सिंह, डीन डॉ. राहुल बारजिभे, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट अधिकारी प्रा. आय.डी. पॉल व सर्व विभाग प्रमुखांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
तीन वर्षांत सर्वाधिक विद्यार्थ्यांना नोकऱ्या: डॉ.आर.पी.सिंह
वर्तमान स्थितीत कॉलेजमधून शिक्षण घेऊन बाहेर पडणारे विद्यार्थी डिजिटल तंत्रज्ञानाची जाण असलेली आहेत. संभाषण कौशल्य, आत्मविश्वास, तांत्रिक माहितीचे सखोल ज्ञान आणि रोजगाराभिमूख कौशल्य असल्यामुळे शेकडो विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी मिळताय. गेल्या तीन वर्षांच्या तुलनेत यंदा पहिल्या टप्प्यात सर्वाधिक विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळाल्या आहेत असे प्राचार्य डॉ.आर.पी.सिंह यांनी सांगितले.
महाविद्यालयातील कल चाचणीचा फायदा: मनीष लोखंडे
मुलाखतीच्या वेळी उमेदवारांवर प्रचंड ताण येतो. हा ताण कमी व्हावा आणि विद्यार्थ्यांना रोजगाराच्या चांगल्या संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी महाविद्यालयात नोकरीविषयक समान कल चाचणी घेतली. त्यामुळे मनावरील ताण कमी झाल्याने फायदा झाला असे मनीष लोखंडे याने सांगितले.
प्रा.राम अग्रवाल, प्रा.दीपक खडसे, प्रा.स्मिता चौधरी यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *