भीती कोरोनाची ; सहा दिवसांत साडेपाच लाखांचे तिकीट रद्द ; तिकीट बुकिंग खिडक़ीवर शुकशुकाट- रेल्वे प्रशासनातर्फे जनजागृतीवर विशेष भर

भुसावळ (प्रतिनिधी )-
मध्य रेल्वेच्या अत्यंत महत्त्वाच्या भुसावळ विभागातील भुसावळ रेल्वे स्थानकावर रेल्वे प्रवाशांमध्ये जागृतता निर्माण व्हावी याकरिता ध्वनिफीत, व्हिडिओ द्वारे जनजागृती करण्यात येत असून कोरोनाचे सावट थेट रेल्वे प्रवाशांवर झाला असून सहा दिवसात तब्बल ९२० आरक्षण तिकीट रद्द करण्यात आली असून यातून साडे पाच लाखाचा परतावा प्रवाशांना करावा लागला आहे.
रेल्वे प्रवाशांवर कोरोनाचे सावट स्पष्ट दिसून येत असून खबरदारी म्हणून दोन महिन्या आधी बुक केलेले आरक्षण तिकीट प्रवाशांनी रद्द करण्यावर भर दिले आहे. गेल्या सहा दिवसांमध्ये सातत्याने रद्द करण्यात येणाऱ्या प्रवासी तिकिटांच्या संख्येमध्ये वाढ होताना दिसत आहे, एका तिकिटावर सहा प्रवासी जास्तीत जास्त आरक्षण करू शकतात, अशा प्रकारे ९२० तिकीटातून जवळपास ४ हजार पेक्षा जास्त प्रवाशांनी खबरदारी म्हणून गर्दीमध्ये जाणे टाळण्यासाठी तिकीट रद्द केले आहे,
कोरोनाची भीती ; मेट्रो सिटीत प्रवास नको
कोराेनाची’ जनजागृती म्हणून प्रशासन सज्ज झाली आहे प्रत्येक मोबाईलच्या कॉलर ट्यून वर कोरोना विषयी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून माहिती दिली जात आहे यात विशेष करून गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये यावर जास्त भर देण्यात येत आहे याचा धसका रेल्वे प्रवाशांनी घेतला असून ज्या शहरांमध्ये मोठी गर्दी असे असते अशा मेट्रो सिटी मध्ये नागरिकांनी तिकीट रद्द करून जाणे टाळत आहे .
भुसावळ रेल्वे स्थानकावर दररोज १३० पेक्षा जास्त प्रवासी गाड्या ये-जा करतात त्यातून लाखो प्रवासी दररोज भुसावळच्या संपर्कात येऊन विविध प्रांतात जात असतात. भुसावळ येथे रेल्वे प्रशासनातर्फे विशेष खबरदारी घेण्याची गरज आहे यासाठी मध्य रेल्वेतर्फे प्रारंभिक स्थानकावरून सुटणाऱ्या गाड्यांची स्वच्छता वर विशेष भर देण्यात येत असून गाड्यांचे प्रवेशद्वार स्टॅन्ड ,गाड्यांमधील बेसिन या ठिकाणी विशिष्ट लिक्विड द्वारे स्वच्छता करण्यात येत आहे.
सोशल मीडियाद्वारे जनजागृती
रेल्वे प्रशासनातर्फे युट्यूब, इंस्टाग्राम, ट्विटर, फेसबुक ,व्हाट्सअप तसेच पोस्टर बॅनर उद्घोषणा व्हिडीओ क्लिप याद्वारे रेल्वे जनजागृती करण्यात येत आहे परंतु रेल्वेस्थानकाच्या दोन्ही प्रवेशद्वारावर प्रतीक्षालयामध्ये रेल्वे स्थानका वर निर्जंतुकीकरण करण्यासाठी दिवसातून तीन ते चार वेळा लिक्विड फवारणी करून स्वच्छता ठेवणे हे तितकेच महत्त्वाचे आहे. शिवाय प्रवेशद्वारावर तपासणीची उपाय योजना करणे गरजेचे आहे.
मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागातील रेल्वे हॉस्पिटलमध्ये कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सतर्कतेच्या सूचना देण्यात आलेले आहे. रेल्वे हॉस्पिटलमध्ये १५ खाटाचे एक स्वतंत्र विलगीकरण कक्ष तयार केला आहे. तेथे संशयितांवर उपचार करता येऊ शकतात, तसेच त्यांच्या सोबत नातेवाईकांसाठी ही एक विशिष्ट उपाययोजना करण्यात आली आहे.
मेट्रो सिटीतील प्रवाशांच्या परतीचे लोंढे
शासनाने खबरदारी उपायोजना म्हणून ३१ मार्चपर्यंत शाळा, महाविद्यालय व गर्दीच्या ठिकाणी आपत्कालीन स्थिती दर्शविल्यामुळे कामानिमित्त शिक्षणासाठी पुणे, मुंबई ,नाशिक, नागपूर मेट्रो सिटी मध्ये गेलेले नोकरदारवर्ग व विद्यार्थीवर्ग हे आपल्या गावी येण्यासाठी गर्दी करताना दिसून येत आहे. यामुळे भुसावळकडे मेट्रो शहरातून येणाऱ्या गाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे .
तिकीट बुकिंग खिडकीवर शुकशुकाट
भुसावळ येथील दक्षिणेकडील, उत्तरेकडील तिकीट बुकिंग खिडकीवर एरवी मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येते परंतु गेल्या चार-पाच दिवसांपासून खिडक्यांवर शुकशुकाट दिसून येत आहे . प्रवासी ऑनलाईन ॲप्स वापर करून तिकीट बुक व रद्द करत असल्याचे चित्र आहे.
गेल्या सहा दिवसांत साडेपाच लाखांचे तिकीट रद्द झाले असून यात दिनांक ९ मार्च रोजी १४२ टिकिट रद्द यात तिकिट परतावा ८१,९६० १० मार्च रोजी ५५ तिकीट रद्द परतावा ३५,५१५,११ मार्च रोजी १३५ ८५,६७०, १२ मार्च रोजी १४८ ७८,२७५ परतावा १३ मार्च १८० तिकीट १,२०,३०० परतावा , १४ मार्च रोजी २६० १,५५,८०० असे साडेपाच लाखांचे तिकीट रद्द झाले आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *