भुसावळात राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष व नगरसेविका यांनी स्वखर्चातून केली ढाप्याची दुरुस्ती ; अंतर्गत वाहतूक पूर्णपणे सुरळीत

भुसावळ (प्रतिनिधी )-
राष्ट्रवादीच्या नगरसेविका मीनाक्षी धांडे व राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन धांडे यांनी स्व-खर्चातून ढाप्यांची दुरुस्ती करुन काही नवीन ढापे तयार केल्याने याभागातील नागरीकांनी समाधान व्यक्त केले आहे. शहरातील गंगाराम प्लॉट भागात आठवडे बाजार भरतो तसेच अवजड वाहनांचा सतत वापर असल्याने अनेकदा लहान मोठे अपघात घडत होते . बरेचदा
बाजारातील साहित्य गटारीत पडत असल्याने नुकसान होत होते . गटारींची स्वच्छता करण्यासाठी ढापे तोडण्यात आल्याचेही लक्षात आल्यानंतर नगरसेविका मीनाक्षी धांडे व राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन धांडे यांनी पालिकेकडे ढापे दुरुस्ती तर काही ठिकाणी नवीन ढापे तयार करण्याची मागणी केली होती, मात्र पालिका प्रशासनाकडून वारंवार या बाबी कडे दुर्लक्ष होत असल्याने नगरसेविका मिनाक्षी धांडे व राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन धांडे यांनी स्व-खर्चातून दुरुस्तीला सुरवात केली आहे. गंगाराम प्लॉट भागातील माहूरकर टेंट हाऊस, पाच नंबर शाळेजवळ, पिंगळे दुकाना समोर, सदानंद डेअरी मागे सदानंद वराडे यांच्या घराजवळ तसेच बबलू ढाके यांच्या घराजवळ ढाप्यांची दुरुस्ती केली तर काही ठिकाणी नवीन ढापे तयार करण्यात आल्याने नागरीकांनी समाधान व्यक्त केले. दरम्यान, ढाप्यांची डागडूजी रखडली असती तर पुन्हा वाताहत होऊन अंतर्गत वाहतूक पूर्णपणे बंद होणार होती. नगरसेविका मीनाक्षी धांडे व राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन धांडे यांनी स्वखर्चातून हे काम पूर्ण केल्याने नागरीकांनी त्यांचे आभार मानले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *