मुक्ताईनगर तालुक्यातील घटना : तापी नदी पात्रात सापडले नवजात अर्भक –


मुक्ताईनगर : तापी नदी पात्रामध्ये एक अनोळखी नवजात बालकाचा मृतदेह पाण्यावर तरंगत असल्याचे उघडकीस आली आहे. याप्रकरणी माहिती पोलीस पाटील संजय त्र्यंबक पाटील (रा. मेळसांगवे) यांनी पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीनुसार मुक्ताईनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अनोळखी नवजात अर्भक पुरुष जातीचे असून उपजिल्हा रुग्णालय मुक्ताईनगर येथे शवविच्छेदन करण्यात आले. गुन्ह्याचा पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी राजकुमार शिंदे व पोलीस निरीक्षक नागेश मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक विजय पढार, प्रशांत चौधरी मुक्ताईनगर पोलीस स्टेशन हे करीत आहे.