खड्डयांवर लांब उडी : शिवसेनेचे उपहासात्मक आंदोलन !


भुसावळ- संपूर्ण शहरात रोडवर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. न. पा. लक्ष देत नाही. न. पा. अधिकाऱ्यांचा निषेध म्हणून लांब उडी स्पर्धा शिवसेनेने आयोजित केल्या होत्या अशी माहिती शहर प्रमुख दीपक धांडे यांनी दिली.
याबाबतीत सविस्तर माहिती अशी कि, संपूर्ण भुसावळ शहरात मुख्य रोडवर मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. काही खड्डे हे पावसा आधीचे आहे. ते बुजवावेत म्हणून शिवसेनेतर्फे वेळोवेळी निवेदने दिली आहेत. परंतु न. पा. चे अधिकारी, अभियंता लक्ष देत नाही. त्यामुळे शहरात कोट्यावधी रूपयांची अन्य निधी ची कामे सुरू आहेत. मात्र शहरातील खड्डे बुजविण्यासाठी न. पा. कडे निधी नाही. ही बाब अत्यंत निषेधास्पद आहे.
शहरातील काही रोड अत्यंत खराब झालेले आहेत. त्यामुळे तेथे विद्यार्थी पडतात आणि अपघात होतात. अनेकांचे हात, पाय फ्रॅक्चर झाले. गंभीर रूग्ण रिक्षातून जाऊ शकत नाहीत. शहरातील अनेक भागातून नागरिक न. पा. वर, प्रांत कार्यालयावर निवेदने, मोर्चा काढून लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत आहेत.
म. गांधी यांच्या पुतळ्याजवळ मोठे खड्डे पडलेले आहेत. तेथे अनेक विद्यार्थ्यांनी उड्या मारण्याचा प्रयत्न केला. परंतु कोणालाही लांब उडी मारून स्पर्धा जिंकता आली नाही. यावरून लक्षात येईल कि, खड्डे किती मोठे आहेत?
या आंदोलनात शहर प्रमुख उबाठा दीपक धांडे, बबलू बराटे, मा. नगरसेवक दिलीप सुरवाडे, मा. नगरसेवक कैलास लोखंडे, रहीम कुरेशी, सुरज पाटील, मेहमूद शेख, पिंटू भोई, संजू भोई,नरेन लोखंडे,जितू पाटील,पेंटर मनोज पवार आदि पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
न. पा. विरोधात प्रचंड घोषणा देण्यात आल्या. पोलीस बंदोबस्त चोख होता. आंदोलन प्रसंगी वाहन चालक उत्सुकतेने थांबून विचारत होते आणि न. पा. चा धिक्कार करत होते.