भुसावळ (प्रतिनिधी )-
जागतीक ग्राहक दिनानिमित्त येथील तहसील कार्यालयात रविवार दिनांक १५ मार्च रोजी ११ वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे .
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी भुसावळ प्रांताधिकारी रामसिंग सुलाने असून कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून आमदार संजय सावकारे , अशासकीय सदस्य राज्य ग्राहक संरक्षण परिषद संघटन मंत्री ग्राहक पंचायत
मंत्रालय मुंबई
तसेच अ.भा.ग्राहक पंचायत जळगाव जिल्हा अध्यक्ष विकास महाजन, ग्राहक पंचायत जिल्हा अध्यक्ष व भुसावळ दक्षता समिती सदस्य प्र. ह. दलाल , ग्राहक परिषद सदस्य राहुल बोरसे, भुसावळ जागो ग्राहक जागो अध्यक्ष गजानन पुरुषोत्तम जोशी ,जिल्हा सदस्य ग्राहक पंचायत संजय शुक्ल , ग्राहक पंचायत अध्यक्ष उदय सुर्यवंशी, ग्राहक पंचायत संघटन मंत्री मिलींद मांडळकर,
भुसावळ अध्यक्ष अ.भा.ग्राहक पंचायत अॅड.कल्पना टेमाणी,
सचिव अॅड.जास्वंदी भंडारी, उपाध्यक्ष राजेश सैनी, तालुका संघटक उज्वला बागुल,सचिव ग्राहक पंचायत,भुसावळ नाना पाटिल, तालुका अध्यक्ष ग्राहक पंचायतीचे मनोज माहेश्वरी आदि
उपस्थित राहणार आहे . कार्यक्रमास सर्वानी
उपस्थित रहावे असे आवाहन
तहसिलदार दिपक धिवरे यांनी केले आहे .



