भुसावळात शिवजयंती निमीत्त प्रभाग २० मध्ये पाण्याच्या टॅंकर चे लोकार्पण ;

भुसावळ (प्रतिनिधी )-
शिवजयंती निमित्त भुसावळातील नगरसेवक पिंटू ठाकूर यांनी वार्डातील रहीवाश्यांना दिली आगळी वेगळी भेट, वार्डातील गरीब व मध्यमवर्गीय रहीवाश्यांचे सुरु झालेल्या उन्हाळ्यात पाण्यासाठी हाल होऊ नये याकरीता भुसावळ येथे शिवजयंती निमीत्त वॉर्ड क्रमांक २० मध्ये या भागातील नगरसेवक महेंद्रसिंग (पिंटू) ठाकुर यांच्या तर्फे पाण्याच्या टॅंकर चे लोकार्पण करण्यात आले . यावेळी माजी प्रभारी नगराध्यक्ष युवराज लोणारी व प्रमोद सावकारे यांच्या हस्ते टेंकरचे लोकार्पण करण्यात आले . ,यावेळी भाजपा शहर अध्यक्ष दिनेश नेमाडे,पुरुषोत्तम नारखेडे,मुकेश गुंजाळ,पिंटू कोंठारी,प्रवीण गुंजाळ,निक्की बतरा,सतीश सपकाळे, आरपीआय चे जिल्हा अध्यक्ष राजू सूर्यवंशी,अरुण धनगर,चंदू बडगे, संजू ठाकुर,स्वप्नील गोकूळ,सोनार बंडू,निलेश शहा,मोहन ढोले,आकाश राजपुत,प्रवीणसिंग पाटील,प्रमोद ठाकुर,जगदीश ठाकुर,गोकूळ शेरा, विकास खडके,शुभम भावसार,रवी ढगे,निखील वाणी,सोन्या गुजी,चेतन मिस्त्री,प्रदीप कोळी,वैभव सुरंगे,संजय खडसे,स्वप्नील टेलर,दीपक कापसे,मुरली ढोले,वासू खंडारे,नरेंद्र संघवी,प्रतीक खडसे,सागर ढोले,दर्शन बिर्हाडे,स्वप्नील पाटील,पवन खंदारे,प्रथमेश दिधे,कृष्णा अहिरे व शिवाय ग्रुप मित्र परिवारातील सदस्य
आदी उपस्थित होते.पिंटू ठाकूर यांनी आणलेल्या टँकर मुळे यंदा उन्हाळयात त्यांच्या वार्डातील रहीवाश्यांना दिलासा मिळणार आहे.पाण्यासाठी वण वण फिराव लागणार नाही,या आधी सुद्धा पिंटू ठाकूर यांनी दिनदयाल नगरात स्वखर्चाने बोअरिंग करुन वाडीतील लोकांच्या घरात पाणी पोहोचवले आहे,भुसावळात जनतेची सेवा करणारा खरा जनसेवक असल्याची भावना नागरिकांनी यावेळी व्यक्त अकेल्या . टँकर लोकार्पण करून प्रभाग 20 सह परिसरातील नागरिकांच्या समस्या दूर केल्याबद्दल नगरसेवक पिंटू ठाकूर यांचे कौतुक होत आहे.
नागरिकांना मोफत जलसेवादेणार – पिंटू ठाकुर
नागरिकांच्या अडीअडचणी च्या वेळेस किंवा प्रासंगिक कार्यानुसार तसेच नैसर्गिक आपत्ती समयी शहरात मोफत जलसेवा करण्यात येणार असल्याचे नगरसेवक पिंटू ठाकुर यांनी यावेळी म्हटले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *