शिवजयंती निमित्त भुसावळात महाआरोग्य शिबीर; ४४५ नागरिकांनी घेतला लाभ

भुसावळ (प्रतिनिधी )-
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त शहरातील श्रीनगर, भोई नगर, अयोध्या नगर, जुना सातारा, मुक्ताई कॉलनी, खळवाडी, रेल दुनिया, गणेश कॉलनी, भिरुड कॉलनी, स्वामी विहार, भुसावळ हायस्कूल परिसरातील नागरिकांसाठी मुक्ताई कॉलनी, नगर पालिकाशाळा क्र. १ समोर मोफत आरोग्य तपासणी शिबीर गुरुवार ११ रोजी सकाळी ८ ते ११ या वेळेत आयोजित करण्यात आले होते. या शिबीरात ४४५ नागरीकांनी आरोग्याची तपासणी करुन घेतली.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन शिबीराचे उद्धाटन झाले. या समारंभाचे अध्यक्ष शांताराम पाटील(गुरुजी) हे होते यावेळी मंचावर अशोक बेंडाळे, झगडू ठोके, मंगला पाटील, यतीन ढाके व शिबीरातील सहभागी डॉक्टर्स उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.धिरज पाटील यांनी करतांना या जळगाव रोड विभागातील सर्व प्रभागातील एक प्रतिनिधी घेऊन आयोजन समिती स्थापन करण्यात आली आहे असे सांगितले व शिबीराच्या आयोजनाबद्दलची पार्श्वभुमि स्पष्ट केली.
शिबिरामध्ये स्त्री रोग तज्ञ डॉ.पवन सरोदे, बालदंत रोग तज्ञ डॉ. हर्षा कोठारी, मोतीबिंदू व नेत्ररोग तज्ञ डॉ. सुनील मेश्राम, फिजियोथेरेपी डॉ.नमिता सरोदे, डॉ.प्रितेश कोठारी यांनी अस्थीरोग तपासणी सोबत बी.एम.डी. मशिनद्वारे हाडातील कॅल्शियम मोफत तपासले. डॉ. ज्योती गुरव, डॉ. भावना प्रजापती, डॉ. वर्षा वाडीले यांनी महालॅब अंतर्गत सीबीसी, कोलेस्टेरॉल, एच आय व्ही, संधीवताच्या रक्त चाचण्या मोफत केल्या गेल्या. श्री रिदम रुग्णालयातर्फे डॉ. तृप्ती तोरकडे, डॉ. शेखर पिवाल यांनी सहभागी नागरीकांचे रक्तदाब तपासणी केली.
नागरीकांसह नगर परिषदेच्या शाळा क्र. १ च्या विद्यार्थ्यांची मोफत दंत तपासणी यावेळी करुन घेण्यात आली. शिबीरास उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन राठोड, शहर पोलिस ठाण्याचे पो.नि.बाबासाहेब ठोंबे तसेच समाजातील मान्यवरांनी सदिच्छा भेट दिली.
या शिबीराचे यशस्वीतेसाठी प्रा.धिरज गणेश पाटील, विशाल प्रल्हाद ठोके, शंतनू गणेश पाथरवट, उदय बोंडे, ललित नेहेते, लव झाडगे, अमोल पाटील, डॉ.तुषार नारखेडे, किशोर चौधरी, भूषण ठोके, कुशल पाटील, प्रा.सीमा पाटील, कविता ठोके, नयना बोंडे, सुरेखा कुरकुरे, सुरज चौधरी, श्याम खैरनार, विकास झांबरे, मनोज तडवी यांनी परिश्रम घेतले.
ज्या रुग्णांची विशेष तपासणी करणे आवश्यक होते अशा काही रुग्णांना शिबीर स्थळावरुन थेेट रुग्णालयात अधिक तपासणीसाठी पाठविण्यात आले.
यावेळी लाभार्थी नागरिकांनी दिल्या प्रतिक्रिया :-
सीबीसी, कोलेस्टेरॉल, संधीवत रक्त चाचण्या ह्या महागड्या आहेत, हजारो रुपयांचा खर्च होतो, शिबिराच्या माध्यमातून घराजवळच सुविधा मिळाली हे अतिउत्तम झाले- धनसिंह बोरणारे, अयोध्या नगर

डोळयांच्या समस्या फार प्रमाणात वाढल्या असून शिबिरातून मोती बिंदू आहे असे समजले, त्वरित उपचार करण्यास सुरुवात करणार आहे.- वंदना भोई, भोई नगर

रस्ते खराब असल्याने हाडांच्या समस्या वाढल्या आहेत, शिबिरातील उपलब्ध मशीन द्वारे हाडातील कॅल्शियम मशिनद्वारे लगेच समजले.- रमेश खैरनार, श्री नगर

महिलांच्या आरोग्याच्या समस्या आजकाल वाढू लागल्या आहेत, शिबिरातून निदान झाल्याने आनंद वाटतो आहे.- आरती चौधरी, गणेश कॉलनी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *