मुस्लिम नुमाईदा फाउंडेशन भुसावळचे कार्य कौतुकास्पद – मुख्याधिकारी महेश वाघमोडे

भुसावळ –
येथील मुस्लिम नुमाइडा फाउंडेशन द्वारा खडका रोड भागातील रॉयल पार्क भागातील निर्माण होणाऱ्या मल्टिनॅशनल हॉस्पिटल परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात मोठ्या झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले त्यावेळी भुसावळ नगरपालिकेचे मुख्याधिकारी महेश वाघमोडे यांनी मुस्लिम नुमाईदा फाउंडेशन तर्फ शहरातील गरीब लोकांसाठी मोफत मल्टिनॅशनल हॉस्पिटल निर्माण केले जात आहे त्यासोबतच त्यांच्या कडून भुसावळ शहरासाठी वृक्षारोपण मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे .यासाठी या फाउंडेशनचे पालक सलीम शेठ चुडीवाले यांनी जागा व 50 लाख रुपये व इतरांनी विविध स्वरूपात डोनेशन देऊन वृक्षारोपणासह मोफत हॉस्पिटलची निर्मिती करत आहेत हे कार्य अनुकरणीय व कौतुकास्पद आहे .इतर समाजानेही यासारखे कार्य करावे असे याप्रसंगी सांगितले .
त्यानंतर भुसावळ नगरपरिषदेचे ब्रँड अँबेसिडर व पर्यावरण नागर प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष नाना पाटील सर यांनीही शहरासाठी माझे एक झाड प्रत्येकाने लावावे व त्याचे संगोपन संवर्धन करावे जेणे करून भविष्यात भुसावळ उष्णतामान कमी होईल असे याप्रसंगी सांगितले .
मुस्लिम इमानदार फाउंडेशनचे सलीम शेठ चुडीवाले यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना वृक्ष लागवड होणे आज गरज आहे यामुळेच आज वृक्ष लागवड करत आहोत .
यावेळी दवाखाना व रॉयल पार्क परीसरात श्री.महेश वाघमोडे मुख्याधिकारी, न पा भुसावळ तसेच न पा चे ब्रँड ॲम्बेसेडर व पर्यावरण जागर चे नाना पाटील सर यांचे हस्ते वृक्षारोपणचा कार्यक्रम संपन्न
या वेळी न प चे उपमुख्याधिकारी शेख परवेज अहमद, लोकेश ढाके, नगर अभियंता नंदकिशोर येवतकर, वैभव पवार तसेच मुस्लिम नुमाईंदा फाऊंडेशनचे पालक सलिमसेठ चुडीवाले, अध्यक्ष फरहान खान, साबीर भाई मनियार, शेख शोएब, अकील खान, हाजी फारूक देशमुख, शेख सलमान यांच्यासह मोठ्या प्रमाणात परिसरातील नागरिक उपस्थित होते या सर्वांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले