भुसावळ – भुसावळ शहरातील जामनेर रोडवरील हॉटेल हेव्हन येथे दिनांक २२ जून रोजी दुपारी ऑल इंडिया संविधान आर्मी व विविध दहा संघटना वतीने मा.नगरसेविका पुष्पा सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी भुसावळ शहरातील करोडपती आमदार संजय सावकारे हटाव रोडपती जगन सोनवणे यांना आमदार बनाओ असे व्यक्तव्य जगन सोनवणे यांनी केले.विधानसभा मतदार संघात ऑल इंडिया संविधान आर्मी व विविध दहा संघटना तर्फे २२ जुलै रोजी शहर तसेच ग्रामीण भागात साप्ताहिक अभियान राबविणार आहे. यामध्ये नागरीकांचे व शेतकऱ्यांनाचे प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करणार आहे. एवढेच नव्हे तर भुसावळ विधानसभा क्षेत्राचे करोडपती आमदार संजय सावकारे यांनी अद्यापावतो कुठलाही विकास केला नसल्याने यांना हटाव व रोडपती जगन सोनवणे यांना आमदार बनाओ हा निर्धार आता जनतेने केलेला असून परिवर्तन नक्की १००% होणार आहे. लोकसभेत नवनीत राणा, स्मृती इराणी, पंकजा मुंडे, अँड. उज्वल निकम, रावसाहेब दानवे असे दिग्गज मंत्री पराभूत झाले. संजय सावकारे हे राहुल गांधी पेक्षा मोठे आहे का ? मोठ – मोठे मंत्री पराभूत झाले तर संजय सावकारे का पडणार नाही. विधानसभेची जागा जगन सोनवणे यांना नाही दिली तर प्रचार करणार नसल्याचे ही त्यांनी सांगितले. गेले २५ वर्षांपासून माजी आमदार संतोष चौधरी यांनी साथ दिली आहे मात्र नगर परिषदेच्या आगामी निवडणुकीत संतोष चौधरी यांचा प्रचार करण्यास जगन सोनवणे यांनी नकार दिला आहे.
दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्टेशन बस स्टँड परिसरात श्री. छत्रपती हिमालय जनसंपर्क कार्यालय, संविधान भवन जॉली पेट्रोल पंप जळगांव रोड परिसर, गजानन माऊली साईबाबा यांच्या पवित्र मंदिर जवळ शेतकरी कामगार ग्रामीण कार्यालय उभारण्यात येणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत जगन सोनवणे यांना आमदार बनविण्यासाठी २३ जुलै रोजी परिवर्तन निर्धार मेळावा घेण्यात येणार आहे. यावेळी जनग सोनवणे, राकेश बग्गान, आरिफ शेख तसेच पदाधिकारी उपस्थित होते.


