भुसावळ – भोरगाव लेवा पंचायत ठाया पाडळसेच्या कुटुंबनायक पदावर ललित रमेश पाटील यांची प्रभारी कुटूंबनायक म्हणून नियुक्ती झाल्या बद्दल भुसावळकरांतर्फे सत्कार करण्यात आला. याप्रसंगी चेतन पाटील, सुभाषचंद्र भंगाळे, आरती चौधरी, मंगला पाटील, कीरण चौधरी, शरद फेगडे, आर. जी. चौधरी, अनिल वारके (खडका) व संजय पाटील (साकेगाव) हे हजर होते. या प्रसंगी चेतन पाटील यांनी सगळ्यांच्या वतीने अभिनंदन करून पुढील कार्या साठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
प्रभारी कुटूंबनायक ललित पाटील यांनी सुध्दा चांगले सामाजिक कार्य करून लोकसेवा करण्याचे आश्वासन दिले.
त्या नंतर आरती चौधरी यांची मुख्य कार्य
कार्यकारणीत निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.



