महिला पतंजली भारत स्वाभिमान योग समिती भुसावळच्या वतीने 21 जून आंतरराष्ट्रीय योग दिवस निमित्त कार्यक्रमाचे आयोजन :


भुसावळ – शरीर आणि मन निरोगी राहण्याचा एकमेव सर्वोत्कृष्ठ असा मार्ग म्हणजे योग आहे आपण स्वतः स्वतःला भेटण्याचा संधी म्हणजे योग आहे . म्हणून संपूर्ण विश्वाला हा योगमंत्र व योग सांगण्याकरीत भुसावळ महिला पतंजली भारत स्वाभिमान योग समिती तर्फे 21जून शुक्रवार रोजी सकाळी 5:30 से 6:30 यावेळेत तरोपंथ भवन , संतोषी माता हॉल जवळ भुसावळ येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे .
यामध्ये योगासन व त्याचे महत्वपूर्ण फायदे यावर चर्चा पतंजली योग समिती भुसावळच्या
राज्य कार्यकारिणी सदस्य महानंदा पाटील , भा स्वा संरक्षक जळगाव येथील भवंरलाल प्रजापती यांनी केले आहे प्रत्येक साधकाने व योग प्रेमी नागरिकांनी येताना आपआपली योग मॅट वा सतरंजी सोबत आणावी .