एपीजेकेवायएस च्या चेअरमन पदी सुनील वानखेडे :


भुसावळ – वरणगाव येथील महात्मा गांधी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक सुनील वानखेडे यांची एपीजे अब्दुल कलाम नॅशनल कौन्सिल ऑफ यंग सायंटिस्ट च्या चेअरमन पदी सर्वानुमते निवड करण्यात आले
रमण सायन्स टेक्नॉलॉजी फाउंडेशन इंडिया च्या वतीने देशभरात विद्यार्थ्यांसाठी विज्ञान व गणित या विषयावरती जनजागृती करण्यासाठी एपीजे अब्दुल कलाम नॅशनल कौन्सिल ऑफ यंग सायंटिस्ट ची स्थापना करण्यात आली विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवला जावा तसेच गणित विषय सोपा आहे याबाबतचे विविध कार्यशाळा व सेंटर सुरू करण्यात आले आज रोजी 26 राज्य मध्ये काम सुरू आहे. घेतल्या जातात या माध्यमातून सुनील वानखेडे यांनी व्हाईस चेअरमन असताना विविध कार्यक्रम राबवल्याने नुकतीच अहमदाबाद येथे झालेल्या बैठकीत सर्वानुमते त्यांची पदोन्नती करून चेअरमन पद सोपवण्यात आले या निवडीबद्दल त्यांचे कौतुक रमण सायन्स टेक्नॉलॉजी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉक्टर चंद्रमौली जोशी यांनी केले