रेल्वे लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई आणि गोरखपुर दरम्यान प्रवाशांच्या गरजेनुसार १२ विशेष ट्रेन सेवा चालवणार आहे.

रेल्वेने प्रवाशांच्या गरजेनुसार आणि प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मुंबई ते गोरखपुर दरम्यान १२ विशेष ट्रेन सेवा चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
तपशील खालीलप्रमाणे आहेतः
लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई-गोरखपूर विशेष
05326 विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून बुधवार, शुक्रवार आणि रविवारी दि. १९.०६.२०२४ ते दि. ३०.०६.२०२४ या कालावधीत १०.२५ वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी १८.०० वाजता गोरखपुर येथे पोहोचेल. (६ फेऱ्या)
05325 विशेष गोरखपुर येथून सोमवार, बुधवार आणि शुक्रवार दि. १७.०६.२०२४ ते दि. २८.०६.२०२४ या कालावधीत २१.१५ वाजता सुटेल आणि तिसऱ्या दिवशी ०७.२५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे पोहोचेल. (६ फेऱ्या)
थांबे: ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, भुसावळ, खंडवा, इटारसी, भोपाळ, बीना, वीरांगना लक्ष्मीबाई झांसी, उरई, कानपूर सेंट्रल, लखनऊ, बाराबंकी, गोंडा, मनकापुर, बस्ती आणि खलीलाबाद.
संरचना: २ वातानुकूलित-तृतीय, ८ शयनयान, ८ सामान्य द्वितीय श्रेणी यासह २ लगेज कम गार्डच्या ब्रेक व्हॅन. (१८ डबे)
आरक्षण: ट्रेन क्रमांक 05326 चे बुकिंग सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर विशेष शुल्कावर त्वरित उघडले जाईल.
विशेष गाड्यांच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा एनटीईएस ॲप डाउनलोड करा.
प्रवाशांनी या उन्हाळी विशेष रेल्वे सेवांचा लाभ घ्यावा असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


