भुसावळ (प्रतिनिधी ) – भोरगांव लेवा पंचायत ठाया पाडळसे, शाखा भुसावळच्या “समन्वय समिती” तर्फे लेवापाटीदार समाजातील दहावी व बारावीतील गुणवंत मुलामुलींचा “सत्कार समारंभ” शुक्रवार दि. १४ जून २०२४ रोजी १०.३० वाजता खाचणे हॉल, येथे संपन्न झाला.
अध्यक्ष स्थानी ललितकुमार रमेश पटील (युवा नेतृत्व) होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सुनिल भिरुड (माजी मुख्याध्यापक खडके) उपस्थित होते. सर्व प्रथम
दिप प्रज्ज्वलन करून, सरदार वल्लभभाई पटेल व सरस्वती देवीच्या प्रतिमेला हार घालून कार्यक्रमाचा शुभारंभ केला.
समन्वय समितीचे अध्यक्ष सुहास चौधरी यांनी प्रास्ताविक करून कार्यक्रमाचा उद्देश सांगून, या पुढेही असे समाजोपयोगी उपक्रम घेण्याचा मानस व्यक्त केला.
आरती चौधरी यांनी विद्यार्थ्यांना समुपदेशनाच्या दृष्टीने मार्गदर्शन केले व सांगितले की तुम्ही चांगले विद्यार्थी आहेत हे चांगले मार्क मिळवून सिध्द केले आहे आता यापुढे आपल्या आयुष्याची जबाबदारी घेऊन आदर्श व्यक्ती व चांगले नागरीक बना. नाही तर पुण्यातील पोर्शे कार अँक्सीडेंट सारख्या घटना घडतात व आयुष उधवस्त होते.
मंगला पाटील यांनी मुलांनी फक्त डाॅक्टर इंजीनीअर एव्हढेच ध्येय न ठेवता उच्च शिक्षण घेऊन उद्योगजकतेचा सुध्दा विचार करावा व इतरांनाही काम द्यावे, सांगितले.
माजी आमदार निळकंठ फालक यांनी आपले विचार मांडताना सांगितले की दहावी बारावी हा मुलांच्या आयुष्यातील महत्वाचा टप्पा असतो व यावरच आयुष्याची दिशा ठरत असते. त्यामुळे आईवडील व मुले यांनी योग्य निर्णय घेणे आवश्यक असते.
प्रमुख पाहुणे सुनील भिरुड सर, यांनी आपल्या भाषणात पालकांनी मुलांच्या गुणां मधे आनंद मानावा व शिक्षण सर्वांगीण असावे असे सांगितले.
सुत्रसंचलन प्रा. मुकेश पाटील यांनी केले.
आभार सुभाषचंद्र भंगाळे यांनी केले
या वेळेस समन्वय समितीचे
आर.जी.चौधरी , महेश फालक , अरुण चौधरी , हरीष फालक
कावेरी चौधरी , सुभाषचंद्र भंगाळे , अनिल वारके
शरद फेगडे , परिक्षीत ब-हाटे , सुधाकर जावळे ,लालचंद पाटील ,चेतन पाटील ,चंद्रकांत चौधरी , धीरज पाटील ,डिगंबर महाजन , सुभाष झांबरे ,
संजय पाटील
हजर होते.
एकुण १२५ विद्यार्थी विद्यार्थीनींचा सत्कार झाला पैकी काही गुणवंत विद्यार्थी..
१)भुमिका संतोष बढे९८%
सेंट अलायशियस हायस्कूल
2) रीध्देश अनंत बेंडाळे
९७% ताप्ति पब्लिक स्कूल
३)गुंजन पंकज अत्तरदे ९६.४% ताप्ति पब्लिक स्कूल
४)खुशी हेमंत चौधरी ९५.८५%
सेंट अलायशियस हायस्कूल
५)पियुषा मनोज महाजन ९५% अहिल्यादेवी कन्या विद्यालय
६)जितेश ठकसेन राणे ९४.२०% सेंट अलायशियस हायस्कूल
७)प्रिया संजय पाटील ९४% ज्ञानज्योती विद्यालय खडका
८)सानवी चेतन पाटील ९३.८०%
पोतदार स्कुल
९)गौरी गिरीश पाटील ८७%
सेंट अलायशियस हायस्कूल
१०) तेजस योगेश्वर ढाके
१२वीत ९०% नाहटा काँलेज
११) आयुषी ललित धांडे
१२ वीत ८८.५ %
ज्ञान ज्योती विद्यालय खडका
१२) देवश्री निलेश खाचणे १२वीत ८९%
महात्मा गांधी विद्यालय
या प्रसंगी प्रमोद नेमाडे, निळकंठ भारंबे, मामा पाचपांडे, अरुण घनश्याम पाटील , डॉ. व्हि. बी. खाचणे, किरण महाजन . गोविंदा ढाके, उल्हास पाटील कोल्हे सर, पंढरीनाथ लोहार, सुरेश निवृत्ती पाटील व समाजातील मान्यवर मोठय़ा संख्येने उपस्थित होते. यशस्वीते साठी नितीन ब-हाटे, मनोज जावळे अशोक कोळी यांनी परीश्रम घेतले



