जळगाव, – रावेर लोकसभा मतदार संघातून महायुतीच्या भाजपच्या उमेदवार रक्षाताई खडसे या विजयी झालेल्या आहेत.

रावेर लोकसभा मतदार संघात भाजप उमेदवार रक्षा खडसे यांनी विजयाची हॅट्रिक साधत विजय संपादन केला आहे. जवळपास दोन लाख पेक्षा जास्त मतांनी रक्षा खडसे यांनी लीड घेत विजय मिळविला. शरद पवार गटाचे श्रीराम पाटील यांचा त्यांनी पराभव केला आहे.
रावेरमध्ये रक्षा खडसे यांनी तिसऱ्यांदा विजय मिळविला आहे. ,१९ सांव्या फेरीपर्यंत रक्षा खडसे यांना एकूण ५ लाख २४ हजार ४८० मते मिळाली तर श्रीराम पाटील यांना ३ लाख १२ हजार ४१८ मते मिळाली. त्यानुसार रक्षा खडसेंनी तब्बल दोन लाख पेक्षा जास्त मतांनी आघाडी घेत त्यांनी विजय मिळवला.


