भुसावळ : साकेगाव शिवारातील वीटभट्टीवर काम करणार्या एका कुटूंबातील 13 वर्ष सहा महिने वयाच्या अल्पवयीन मुलीला अज्ञाताने फूस लावून पळवून नेले. ही घटना 29 मे रोजी पहाटे चार वाजता घडली. याप्रकरणी अज्ञाताविरोधात पीडीतेच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

साकेगाव शिवारात, एमआयडीसी रोडवरील एका वीटभट्टीवर छत्तीसगड राज्यातून कुटूंब कामासाठी आले आहे. वीटभट्टीवर या कुटूंबाचा रहिवास असून या कुटूंबातील अल्पवयीन मुलीला अज्ञाताने काहीतरी फूस लावून पळवून नेले. हा प्रकार 29 मे रोजी पहाटे चार वाजेच्या सुमारास उघडकीस आला. उंची पाच फूट, रंगाने सावळी, अंगात काळ्या रंगाचा सूट, पायात लाल रंगाची चप्पल, कानात बाळी असे पिडीतेचे वर्णन आहे. तपास महिला उपनिरीक्षक पूजा अंधारे करीत आहेत.


