जागतिक तंबाखू विरोधी दिवस जनजागृती आणि शपथ देवून भुसावळ मध्ये साजरा :


भुसावळ – नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या जळगाव जिल्हा शाखे तर्फे आज जागतिक तंबाखू विरोधी दिवसाचे औचित्य साधून उन जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. नवजीवन हॉस्पिटल आणि व्यसनमुक्ती केंद्र, सक्षम सेवा फाऊंडेशन भुसावळ आणि नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य जिल्हा जळगाव शाखेतर्फे आयोजित या कार्यक्रम प्रसंगी अध्यक्ष म्हणून दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ आर पी फालक तर प्रमुख पाहुणे म्हणून रोटरी क्लब ऑफ भुसावळ चे अध्यक्ष विकास कात्यायनी, रोटरी क्लब चे संचालक आणि डॉ उल्हास पाटील मेडिकल कॉलेज चे डीन डॉ नारायण आर्विकर, नवजीवन हॉस्पिटल आणि व्यसनमुक्ती केंद्राच्या संचालिका डॉ वंदना वाकचौरे, सक्षम समुपदेशन केंद्राच्या संचालिका सौ आरती चौधरी आणि नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य जळगाव जिल्हा शाखेचे संघटक प्रा डॉ दयाघन एस राणे हे उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्रा. डॉ दयाघन राणे यांनी तंबाखू च्या व्यसनाचे गांभीर्य स्पष्ट केले. त्याच बरोबर तंबाखू च्या व्यसनामुळे देशपातळीवर होणाऱ्या नागरिकांच्या आरोग्यमध्ये निर्माण झालेल्या समस्यांबद्दल चर्चा करून या व्यसनाच्या निर्मूलनासाठी जागतिक स्तरावरून तंबाखू विरोधी दिवस आयोजित करावा लागतो हे सर्वांनीच लक्षात घेतले पाहिजे असे सांगितले.
समुपदेशक म्हणून बोलताना सौ आरती चौधरी यांनी सुरुवातीला व्यसन आणि सवय या मधील फरक स्पष्ट करून मग समुपदेशन करीत असताना आलेले अनुभव स्पष्ट करताना सांगितले की काही लोक एखादे व्यसन सोडत असताना दुसऱ्या एखाद्या व्यसनात अडकतात. तसे करण्या ऐवजी आपल्याला असणाऱ्या एखाद्या छंदात रमावे, आवडत्या ठिकाणी जावे. गाणी ऐकावीत असे पर्याय सुचवले. व्यसनमुक्ती केंद्राच्या संचालिका डॉ वंदना वाकचौरे यांनी व्यसनामुळे शरीराची जी हनी होते ती कधीही भरून निघत नाही. आपले शरीर अनमोल असून अमली पदार्थांच्या सेवनाचे नादी लागून ते नष्ट करू नये. तसेच कुटुंबातील लहान मुले मोठ्यांचे अनुकरण करतात म्हणून मोठ्यांनी जबाबदारीने वागत व्यसन करणे टाळावे असे आवाहन केले. रोटरी क्लबचे अध्यक्ष श्री विकास कात्यायनी यांनी समाजात वाढत्या व्यसनांच्या आहारी गेल्यामुळे अनेक सामजिक समस्या निर्माण झालेल्या आहेत. त्यांच्या निर्मूलनासाठी समाजातील जागृत नागरिक प्रयत्नशील आहेत ही, पण सामाजिक जागृती करीत असतानाच त्या मध्ये तरुणाई ने सहभागी झाले पाहिजे असे आवाहन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानावरून बोलताना प्राचार्य डॉ आर पी फालक यांनी सांगितले की आज महाविद्यालयीन तरुण मोठ्या प्रमाणात व्यसनाधीन झालेला आहे. अमली पदार्थांच्या व्यसना सोबत इंटरनेट आणि मोबाईल चे व्यसन वाढते आहे. समाजात इतरांशी संपर्क ठेवत असताना प्रत्येक व्यक्ती मधील समाजमान्यता असणारे म्हणजेच चांगले गुण आपण स्विकारावे आणि चांगले नसणारे गुण स्वीकारू नये म्हणजे आपण व्यसना सारख्या सवयींपासून स्वतःला वाचवू शकू. तसेच शाळा आणि महाविद्यालय परिसरात तंबाखू जन्य पदार्थांचे सेवन कर्मचारी किंवा विद्यार्थ्यांकडून झाले, किंवा असे पदार्थ या परिसरात उपलब्ध झाले तर इतर विद्यार्थ्यावर हिबत्याचा परिणाम होती आणि मग शाळा प्रशासनाला त्या संदर्भात कारवाई करत “तंबाखू मुक्त शाळा” असा बोर्ड लावावा लागतो
व्याख्यान सत्र संपल्यावर नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य यांनी प्रसारित केलेली व्यसनापासून दूर राहण्याची शपथ मंडळाचे संघटक प्रा. डॉ. दयाघन राणे यांनी उपस्थितांना दिली.
कार्यक्रम प्रसंगी अध्यक्ष डॉ आर पी फालक यांचे स्वागत रोटरी क्लब अध्यक्ष श्री विकास कात्यायनी यांनी, श्री कात्यायनी यांचे स्वागत डॉ हेमंत भंगाळे यांनी, सौ आरती चौधरी यांचे स्वागत डॉ वंदना वाकचौरे यांनी तर डॉ वाकचौरे आणि डॉ दयाघन राणे यांचे स्वागत अध्ययन पॅरामेडिकल कॉलेज च्या प्राचार्य डॉ. रजनी बडगुजर यांनी केले.
कार्यक्रम समाप्ती च्या प्रसंगी नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य जिल्हा जळगाव शाखेचे संघटक यांनी उपस्थितांचे आभार मानले.
कार्यक्रम प्रसंगी कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालय यावल चे भौतिक शास्त्र विभाग प्रमुख प्रा डॉ हेमंत भंगाळे यांची विशेष उपस्थिती होती या सह जळगाव जिल्ह्यातील अनेक गावातील नागरिक आणि तरुण कार्यक्रमासाठी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीते साठी राजोरे ता यावल येथील साहिल पाटील, प्रथमेश सोनार, नवजीवन हॉस्पिटल आणि व्यसनमुक्ती केंद्राच्या विनीत दवंगे, सारिका महाले, अश्विनी पवार, हेमंत मोरे, तन्वीर जकिर, बबलू पाटील आणि इतर कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभले.