आ. सावकारे व कुटुंबाला वाय प्लस सुरक्षा द्यावी : महायुतीच्या पदाधिकार्‍यांनी दिले उपविभागीय अधिकारी व डीवायएसपी यांना निवेदन :

भुसावळ- माजी नगरसेवक संतोष बारसे व सामाजिक कार्यकर्ते सुनील राखुंडे यांच्या हत्येने भुसावळ हादरले असतांनाच प्रमोद सावकारे यांना देखील जिवे ठार मारण्याची धमकी देण्यात आल्याने यात भर पडली आहे. याचा निषेध करतांनाच शहरातील गुंडगिरीचे निर्दालन करण्यात यावे. तसेच, आमदार संजय सावकारे व त्यांच्या कुटुंबियांना ‘वाय प्लस’ दर्जाची सुरक्षा पुरविण्यात यावी या मागणीसाठी आज महायुतीच्या पदाधिकार्‍यांनी उपविभागीय अधिकारी व डीवायएसपी यांना निवेदन दिले.भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक संतोष बारसे यांची निर्घृण हत्या करण्यात आल्यानंतर शहरात गुंडागर्दी उफाळलेली दिसून येत आहे अश्यातच भुसावळ तालुक्याचे आमदार संजय सावकारे यांचे मोठे बंधू सामाजिक कार्यकर्ते प्रमोद सावकारे यांना। सुद्धा फोनवरून धमकी देण्यात आलेली आहे या सर्व गुंडागर्दीच्या व या घटनेचा विरोधात निषेध करण्यात आला . यावेळी भारतीय जनता पार्टी भुसावळ तालुका ग्रामीण तसेच भुसावळ शहर व अखिल भारतीय सरपंच परिषद भुसावळ व भारतीय जनता पार्टी भुसावळ शहर व्यापारी आघाडी व युवा मोर्चा शहर व ग्रामीण सर्व पदाधिकारी भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती जमाती मोर्चाचे जिल्हा व तालुक्याचे पदाधिकारी तसेच भारतीय जनता पार्टी महिला आघाडी व अन्य संघटनांच्या मार्फत निषेध करण्यात आला तसेच आमदार संजय सावकारे व त्यांच्या कुटुंबियांना ‘वाय प्लस’ दर्जाची सुरक्षा पुरविण्यात यावी अतिरिक्त पोलीस संरक्षण देण्यात यावे या मागणीचे निवेदन देण्यात आले . यावेळी भाजपा शहर अध्यक्ष युवराज लोणारी , राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेश नेमाडे , संतोष चौधरी (दाढी ) , भाजप महिला आघाडी अलका शेळके , छाया पाटील , शहराध्यक्षा अनिता आंबेकर, वैशाली सैतवाल , परीक्षित ब-हाटे ,रामाशंकर दुबे , संदीप सुरवाडे , जयंतीलाल सुराणा , पवन बुंदेले ,खुशाल जोशी , श्रेयस इंगळे , सतीश सपकाळे , संदीप सुरवाडे , सचिन धांडे गीरीश, महाजन , ऍड बोधराज चौधरी , प्रमोद नेमाडे , गुणवंत बोरोले , बापू महाजन , बी एल पाटील सर, दिलीप कोळी , नगरसेवक निक्की बत्रा , दिनेश राठी , प्रतिभा चौधरी ,गौरव लोणारी , पल्लवी वरके , शोभा भिरुड , यांच्यासह पदाधिकारी व कार्यकतें उपस्थित होते .तसेच तालुक्यातील कार्यकर्ते माजी नगरसेवक बूथ प्रमुख वारियर्स सरपंच उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य शेतकी संघाचे सर्व संचालक, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सर्व संचालक व महिला आघाडीच्या सर्व पदाधिकारी ,कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते