भुसावळ – ज्या चवदार तळ्यावर जाऊन भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार व परमपूज्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दलित बांधवांना उद्धाराचा नवीन मार्ग दाखवून दिला, त्याच पवित्र ठिकाणी काल त्यांचा फोटो फाडण्याचे दुष्कृत्य करून आपली विकृत मानसिकता जितेंद्र आव्हाड यांनी पुन्हा एकदा दाखवून दिली.

जामनेरात जितेंद्र आव्हाडांचा पुतळा जाळून निषेध.
आव्हाडांच्या विकृत प्रवृत्तीचा जामनेर येथे जामनेर तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने निषेध नोदवुन आंदोलन कऱण्यात आले.तसेच जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन नगरपालिकेच्या जवळ राजमाता जिजाऊ चौकात करण्यात आले. त्याप्रसंगी” जितेंद्र आव्हाड मुर्दाबाद” या घोषणा देत भाजपाच्या कार्यकर्त्यांनी परीसर दणाणून सोडला. त्यावेळी जामनेर तालुका एज्युकेशन सोसायटीचे सचिव जितेंद्र पाटील, माजी गटनेते डॉ. प्रशांत भोंडे, महेंद्र बाविस्कर, माजी उपनगराध्यक्ष डॉ. संजीव पाटील, माजी नगरसेवक बाबुराव हिवराळे आतिश झाल्टे, नवल पाटील, सुहास पाटील, उल्हास पाटील, फारुख मनियार, शेख रहीम, शहराध्यक्ष रविंद्र झाल्टे, अजय पाटील, कैलास पालवे, सुभाष पवार, विजय शिरसाठ
तसेच भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
यावल येथे जितेन्द्र आव्हाडच्या प्रतिमेला भाजपाचे जोडे मारो आंदोलन
यावल ता प्रतिनिधी
यावल शहरातील भुसावळ टी पाँईटवर ३० मे रोजी सकाळी १० वाजता राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष (शरद पवार गटाचे ) आमदार जितेन्द्र आव्हाड यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षाच्या वतीने जोडे मारो आंदोलन करण्यात येऊन त्यांच्या प्रतिमेचे दहन करण्यात आले.
यावल येथे आमदार जितेन्द्र आव्हाड यांच्या निषेधार्थ मोर्चा काढुन जोडे मारो आंदोलन :
आमदार जितेन्द्र आव्हाड यांनी मुंबई मधील महाड येथील चवदार तळ्यावर एका कार्यक्रमात आक्रमक भुमिका घेत मनुस्मृती ग्रंथाचे दहन केले असुन, महाराष्ट्र राज्य शासनाच्या विरूद्ध जाऊन बोलले म्हणुन या घटनेच्या निषेर्धात भाजपाच्या वतीने आंदोलन करण्यात येवुन आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरूद्ध घोषणा देण्यात आल्या. प्रसंगी या विषयाला संपुर्ण महाराष्ट्र राज्यातुन विरोध दर्शविला जात असुन यावल येथे देखील भारतीय जनता पक्षाच्या वतीने आमदार जितेन्द्र आव्हाड यांच्या निषेधार्थ मोर्चा काढुन जोडे मारा आंदोलन करण्यात आले.
यावेळी यावल कृषी उत्पन्न बाजार समिती पासुन मोर्चा काढण्यात आला यात भारतीय जनता पक्षाचे यावल तालुकाअध्यक्ष उमेश फेगडे, यावल कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती नारायण चौधरी, माजी नगरसेवक व आश्रय फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ कुंदन फेगडे, माजी जिल्हा परिषदच्या शिक्षण व आरोग्य सभापती रविन्द्र उर्फ छोटू पाटील ,भाजपा सहकार आघाडीचे जिल्हाध्यक्ष राकेश फेगडे, जिल्हा परिषदच्या माजी सदस्या सविता भालेराव, भाजपा अनुसुचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष नागेश्वर साळवे , सरपंच संघटनेचे अध्यक्ष पुरुजीत चौधरी, भाजपाचे शहराध्यक्ष राहुल बारी, रिपाईचे तालुकाध्यक्ष विष्णु पारधे, बबलु धारू, किशोर कुलकर्णी, यांच्यासह मोठया संख्येत भाजपाचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठया संख्येत हजर होते .
मुक्ताईनगरात आमदार जितेंद्र आव्हाड यांचा निषेध : भाजपाचा रास्ता रोको –
मुक्ताईनगर : महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा फाडल्याने आमदार जितेंद्र आव्हाड यांचा निषेध करीत मुक्ताईनगरात भाजपा पदाधिकार्यांनी गुरुवारी रास्ता रोको आंदोलन केले तर रावेरात आमदार आव्हाडांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले.
मुक्ताईनगरात रास्ता रोको
मुक्ताईनगरातील आंदोलनात विधानसभा निवडणूक प्रमुख अशोक कांडेलकर, भाजपा तालुकाध्यक्ष प्रफुल्ल जवरे, तालुका सरचिटणीस चंद्रकांत भोलाणे, राजेंद्र सवळे तालुका उपाध्यक्ष, तालुका उपाध्यक्ष अतुल महाजन, ओबीसी मोर्चा जिल्हा सरचिटणीस मोहन महाजन, अनु.जाती मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष संतोष झनके, भाजयुमो तालुकाध्यक्ष विशाल झाल्टे, शहराध्यक्ष पंकज कोळी, कुर्हा शहराध्यक्ष प्रवीण शिंपी, भाजपा युमो जिल्हा उपाध्यक्ष सोपान झाल्टे, जिल्हा उपाध्यक्ष कामगार आघाडी ईश्वर मिस्तरी, पिंप्राळा सरपंच रामचंद्र कोळी, सोमनाथ पाटील, विकास कांडेलकर, दिलीप सोनवणे आदी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटो फाडून अपमान करणारे रा.कॉं.पार्टी (श.प.) नेते जितेंद्र आव्हाड यांचा भाजपाच्या वतीने खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या उपस्थितीत रावेर येथे जाहीर निषेध करण्यात आला…
रायगड जिल्ह्यातील महाड येथे गोर, गरीब आणि वंचितांसाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी चवदार तळ्याचा सत्याग्रह केला होता. त्याच पवित्र ठिकाणी बाबासाहेबांचा फोटो फाडून अपमान करणाऱ्या विकृत मानसिकतेचे रा.कॉं.पार्टी (शरद पवार गट) नेते जितेंद्र आव्हाड यांचा रावेर येथे भाजपा तर्फे खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या उपस्थितीत जाहीर निषेध करण्यात आला.
पारोळ्यात भाजपाच्या वतीने जोडे मारो आंदोलन
पारोळा —
पारोळा येथे भाजपाचा वतीने जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आले याबाबत अधिक माहिती अशी की मनुस्मृतीतील श्लोकाचा शालेय अभ्यासक्रमात समावेशाचा निषेध करत
शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकराचें चित्र फाडण्याचे जे कृत्य केले या कृत्याचा निषेध करण्यासाठी पारोळा येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर जोरदार घोषणाबाजी करत जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेला
जोडे मारो आंदोलन करण्यात आले यावेळी ॲड अतुल मोरे ,रविंद्र पाटील,मुकुंदा चौधरी ,सचिन गुजराथी ,धिरज महाजन ,नरेंद्र राजपूत, जितेंद्र चौधरी ,नरेंद्र साळी समीर वैद्यसंकेत दाणेज ,विनोद हिंदूजा ,कैलास चौधरी ,अशोक चौधरी, किरण चौधरी, युवराज पाटील, लक्ष्मण महाले,मनोज चौधरी श्रीराम भोई,संतोष महाजन ,पिंटू बारी राजेंद्र चौधरी, गोरख चौधरी ,अजय खाडे मुन्ना निकम ,भावेश पाटील,आर.पी.आय चे ईश्वर वाडिले ,भगवान सोनवणे, अशोक कापडणे आदी कार्यकर्ते उपस्थित होतै.
भाजपातर्फे पाचोऱ्यात आव्हाड यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन…
पाचोरा
मनुस्मृतीतील श्लोकांचा शालेय अभ्यासक्रमात समावेशाचा निषेध व्यक्त करत शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेले पोस्टर फाडले असुन याच्या निषेधार्थ ३० मे रोजी सायंकाळी ५ वाजता पाचोरा भारतीय जनता पक्षातर्फे भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकापासुन ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी बाजार समितीचे माजी सभापती सतिष शिंदे, पंचायत समितीचे माजी सभापती बन्सीलाल पाटील, सुभाष पाटील, प्रदिप पाटील, प्रदिप पाटील, दिपक माने, समाधान मुळे, जगदिश पाटील, योगेश ठाकुर यांचेसह भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीतील श्लोकांचा समावेश करण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे. त्यामुळे संतप्त झालेले शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी महाड येथे मनुस्मृतीचे दहन केले. तसेच अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी केली. मात्र, हे करताना त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे छायाचित्र असलेले पोस्टरही फाडले. त्यावरून त्यांच्याविरुद्ध शिंदेसेनेने नाशिक, भाजपने पुण्यात येथे निदर्शने केली. आव्हाडांनी आंबेडकरांच्या पायावर नाक घासून माफी मागावी, अशी मागणी अजित पवार गटाने केली. तत्पूर्वीच आव्हाडांनी अनवधानाने फोटो फाडला गेला, असे सांगत माफी मागितली. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार, ‘एससीईआरटी’ने राज्याच्या शालेय अभ्यासक्रमात ‘मनुस्मृती’ मधील दोन श्लोकांचा समावेश करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. त्यावर आक्षेप आणि सूचनाही मागवण्यात आल्या आहेत. अनेक पुरोगामी संघटना आणि राजकीय पक्षांनी राज्य सरकारच्या या प्रस्तावास विरोध दर्शवला आहे. विरोधकांनी राज्य सरकारविरोधात टीकेची झोड उठवली आहे. आव्हाड यांनी २८ मे रोजी महाड येथील चवदार तळ्यावर जाऊन मनुस्मृती ग्रंथाचे दहन केले. १९२७ मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन केले होते. आव्हाड यांनी त्याची पुनरावृत्ती केल्याने पाचोरा भाजपातर्फे जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेस डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर जोडे मारो आंदोलन करण्यात आले. चाळीसगाव भाजपातर्फे जोडेमार आंदोलन –

चाळीसगाव – बहुजनांना समान अधिकार मिळवून देण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी महाडच्या ऐतिहासिक चवदार तळ्याजवळ सत्याग्रह केला. त्याच पवित्र भूमीवर महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान करून तसेच फोटो फाडून संविधान विरोधी कृत्य केले म्हणून (शरदचंद्र पवार गटाचे) विकृत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी त्यांची नीच मानसिकता उघड केली.
याचा निषेध म्हणून आज चाळीसगाव येथे भारतीय जनता पार्टी व महायुतीच्या वतीने राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हांड यांच्या प्रतीमेला जोडे मारुण तिव्र जाहीर निषेध व्यक्त केला.
त्याअगोदर पदाधिकारी यांनी चाळीसगाव शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा संगीता गवळी, शहराध्यक्ष नितीन पाटील, अनुसूचित जाती आघाडीचे अमोल घोडे, अभिषेक मोरे, देवेंद्र गांगुर्डे, प्रशिक कदम, विश्वजित जगताप, युवा मोर्चा अध्यक्ष मनोज गोसावी, सदानंद चौधरी, सतीश पाटे, भास्कर पाटील, मोनिका गांगुर्डे, रिजवाना खान, कैलास पाटील, योगेश खंडेलवाल, अकील खाटीक, दिनेश चौधरी, बंडू पगार, आदित्य महाजन, सचिन आव्हाड, सचिन दायमा, अजय अहिरे, देवेंद्र पाटील, धनंजय मराठे यांच्यासह भाजपा पदाधिकारी,महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.








