खळबळजनक, भुसावळात बेछूट गोळीबारात माजी नगरसेवक संतोष बारसे सह सुनील राखुंडेची निर्घृण हत्या :कारमध्ये बसले असताना अज्ञात हल्लेखोरांनी केला गोळीबार

भुसावळ : भुसावळ शहर पुन्हा एकदा गोळीबाराने हादरले असून या गोळीबारात माजी नगरसेवक संतोष बारसे सह सुनील राखुंडे याची निर्घृण हत्या करण्यात आली असंल्याची घटना येथे महामार्गांवरील जुन्या रस्त्यावर मरीमाता मंदिराजवळ पुलाजवळ दोघांवर फायरींग करण्यात आली आहे. पोलीस घटनास्थळी पोहचले असून परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहे . .

भुसावळ शहरातील जुना सातारा परिसरात असलेल्या पुलाजवळ आज बुधवारी रात्री ९.३० ते १० वाजेच्या सुमारास माजी नगरसेवक संतोष बारसे आणि सामाजिक कार्यकर्ते संतोष राखुंडे हे दोघे एका कार मध्ये बसलेले असताना दोघांवर अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या. हल्ल्यात दोघे अत्यंत गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक होती या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी या दोघांना पहिल्यांदा ट्रोमा केअर सेंटरमध्ये आणि नंतर शहरातील खाजगी रुग्णालय दाखल केले. तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी धाव घेतली असून सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी व दवाखान्याकडे रवाना झाले आहेत. दरम्यान खुनाच्या घटनेमुळे भुसावळ पुन्हा एकदा हादरले आहे पीआय गजानन पडघन व सहकारी परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत .