चांदवडच्या राऊड घाटात एस.टी.बसला भीषण अपघात : चार प्रवासी ठार -टायर फुटल्यानंतर बस ट्रकवर आदळल्याची शक्यता : मृतांचा आकडा वाढण्याची भीती

नाशिक : भरधाव एस.टी.बसचा टायर फुटल्यानंतर बस ट्रकवर आदळून झालेल्या भीषण अपघातात चार प्रवाशांचा मृत्यू झाला. चांदवडच्या राऊड घाटात हा अपघात मंगळवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास हा घडला. मुंबई-आग्रा महामार्गावरील राऊड घाटात एस.टी.ची ट्रकला धडक बसल्यानंतर भीषण अपघात झाला तर अपघाताची तीव्रता पाहता मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे.

अनेक प्रवाशांची प्रकृती चिंताजनक
भीषण अपघातानंतर स्थानिकांनी मदतीसाठी धाव घेतली. मंगळवारी सकाळी पावणे दहाच्या सुमारास हा अपघात झाला आहे. जखमींना उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अनेक प्रवाशांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. बस व ट्रकमध्ये धडक होवून भीषण अपघात घडल्याचे सांगितले जात असलेतरी तरी एस.टी.बसचे टायर फुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती असून या संदर्भात पोलिसांकडून अपघाताच्या नेमक्या कारणांचा शोध घेतला जात आहे.

जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर तातडीने उपचार केले जात आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी जखमींच्या प्रकृतीची विचारपूस केली.