भुसावळला १ मे रोजी आर. एस. आदर्श शाळेच्या मैदानावर १४ व १७ वर्षाखालील गटाची टेनिस बॉल क्रिकेट निवड चाचणी

भुसावळ :-महाराष्ट्र राज्य टेनिस बॉल क्रिकेट संघटनेची सब ज्युनियर( U-१७) व मिनी सब जुनिअर (U-१४ ) गटातील मुले/ मुलींची राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धा नागपूर येथे ८ ते १० ‘मे’ २०२४ दरम्यान होणार आहे़ सदर स्पर्धेकरिता जळगाव जिल्ह्यातील खेळाडूंची निवड चाचणी जामनेर रोडवरील सिंधी कॉलनी येथील आर एस आदर्श हायस्कूलच्या मैदानावर बुधवारी १ मे रोजी संध्याकाळी ४ वाजता होणार आहे.

सब ज्युनियर गटासाठी ३० मे २००७ व मिनी सब ज्युनिअर गटासाठी ३० मे २०१० नंतर जन्मलेल्या खेळाडूंनी क्रिकेटच्या गणवेशात स्वतःची बॅट घेऊन निवड चाचणीस उपस्थित राहावे.

या राज्यस्तरीय स्पर्धेतून खेळाडूंची निवड सब ज्युनिअर गटासाठी अहमदाबाद व मिनी सब ज्युनियर गटातील खेळाडूंसाठी गोवा येथे होणाऱ्या राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेसाठी होईल अधिक माहितीसाठी टेनिस बॉल क्रिकेट संघटनेचे जिल्हा सचिव वासेफ पटेल मो.९६७३१७१७८६ यावर संपर्क साधावे