भुसावळ (प्रतिनिधी )-
आपण २१ व्या शतकात आपले पाऊल टाकत असतांना महिलांचा सर्वोतोपरी सर्वांगीण विकास होऊन सक्षम झाल्याचे अभिमानाने सांगतो.परंतू अजूनही बहुतेक भागात आपल्या काही महिला भगिनी स्वत:च्या विकासा बाबत शिक्षणांतच नव्हे तर आरोग्यबाबत सुद्धा अनभिज्ञ आहेत .त्यांना सुद्धा चांगले जिवन जगता यावे या उद्देशाने येथील सखी श्रावणी बहुउद्देशीय संस्थेतर्फे ८ मार्च जागतिक महिला दिनाचे पार्श्वभुमीवर गुरुवार ५ रोजी तालुक्यातील मांडवेदिगर येथील भिलवस्ती, आदिवासी पाड्यावरील महिलांसोबत महिला दिन
साजरा केला . यावेळी
सॕनेटरी नॕपकीन्स विषयी आदिवासी महिलांना माहिती देवून व सहभोजन करण्यात आले .
प्रसंगी मांडवेदिगरच्या सरपंच द्वारकाबाई जाधव ,दुर्गा जाधव ,यांचेसह उपस्थित मान्यवरांचे सत्कार भेटवस्तू देवून करण्यात आला . यावेळी भीलवस्ती मधील महिलांना संस्थेच्यावतीने सँनेटरी पँड वितरित करण्यात आले .
. यावेळी संस्थापक अध्यक्षा सौ राजश्री नेवे, सौ .महानंदा पाटील,सौ. मंदाकिनी केदारे, सौ.अंजली माहुरकर, सौ.माया चौधरी,सौ. वंदना झांबरे,सौ.वर्षा लोखंडे,सौ. अंजली वाघमारे, सौ.भाग्यश्री नेवे, सौ.अनुराधा टाक,आराधना टाक ,पत्रकार
उज्वला बागुल,निकिता खुशलानी, सौ .स्मिता माहुरकर, सौ.सुनिता चौधरी,सौ .अंजली नेवे, सौ राधिका वाणी ,शकीला तडवी यांचेसह संस्थेचे पदाधिकारी व सदस्या
उपस्थित होत्या.
कार्यक्रमास गोरलाल जाधव, संभाजी पवार, उमेश नेवे, दिलीप कुमार टाक, क्रिशी नेवे व ग्रामस्थ मंडळी यांचे विशेष
सहकार्य लाभले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजश्री नेवे यांनी तर सूत्रसंचलन व आभार उज्वला बागुल यांनी मानले .





