भुसावळ (प्रतिनिधी )-
बनावट कागदपत्रांच्या आधारे नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील एका शेतकरी महिलेचा भूखंड दुसऱ्याच एका इसमास विकून भुसावळ येथील टोळीने त्या व्यक्तीकडून २७ लाख ५० हजार रुपये हडप केले आहे. हा प्रकार ते २० नोव्हेंबर २०१५ ते १४ डिसेंबर २०१९ दरम्यान पडला आहे. या फसवणुकीचा उलगडा झाल्यामुळे सात आरोपींविरुद्ध नागपूर जिल्ह्यातील नंदनवन पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान , या गुन्ह्यातील मुख्य आरोपी मोतीराम गणपत गिरणारे व भरत मोतीराम गिरणारे यांनी गेल्या आठवड्यात २२ फेब्रुवारी रोजी भुसावळ येथे भूखंडाच्या विक्रीतून शहरातील भाजपा नगरसेविका यांचे पती संजय आवटे , भुऱ्या बारसे , अनिल डागोर , किशोर उर्फ सुधाकर टोके ( सर्व रा. भुसावळ ) त्याचप्रमाणे रशीद ( पूर्ण नाव माहीत नाही ) व गुलाब ताज उर्फ गुड्डू दोन्ही रा. नागपूर यांच्याविरुद्ध ४६ लाख रुपये खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे . यातील तीन आरोपींना अटकही करण्यात आली होती. त्यामुळे आता हा खंडणीचा गुन्हा ही खरा आहे , का खोटा ? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
गिरनारे पिता पुत्रासह शैलेश किरण सातपुते , जयंत प्रभाकर झांबरे , केशव रामदास नेमाडे ( सर्व रा. भुसावळ ) तसेच भरत महादेव निकोडे , भिमनगर कामाची, यांच्यासह एक अनोळखी महिलेचा या टोळीत समावेश आहे.
कुसुम अण्णाजी नासरे ( ६६ ) ही शेतकरी वयोवृद्ध महिला काटोल तालुक्यातील खंडाळा खुर्द येथील रहिवासी आहे . त्यांनी नंदनवन पोलिस ठाण्याच्या हद्दीत हरपुर मधील रमणा मारुती परिसरात पंधरा क्रमांकाचा भूखंड काही वर्षांपूर्वी विकत घेऊन ठेवला होता . त्यांचे इकडे येणे-जाणे होत नसल्यामुळे या टोळीने हेरून या भूखंडाचा व्यवहाराची व मालकीची माहिती काढली. कागदपत्रे यांच्या नावाने बनावट आधार कार्ड ही तयार केले. कुसुम नासरे नावाने भलत्याच महिलेस निबंधक कार्यालयात उभे करून आरोपींनी मोतीराम गिरणारे व शैलेश सातपुते या दोघांनी हा भूखंड स्वतःच्या नावाने करून घेतला. त्यानंतर या टोळीने महाल मधील प्रसन्ना दत्तात्रय टोकेकर यांना विक्रीसाठी दाखवला . व त्यांच्याशी सौदा करून २७ लाख 50 हजार रुपये किमतीत हा भूखंड टोकेकर यांना विकला.
काही दिवसांपूर्वी कुसुम नासरे व नातेवाईक भूखंडावर गेले. मात्र त्यांना दुसऱ्याच नावाचा फलक दिसला . चौकशी केली असता ही बनवाबनवी दिसून आले . त्यामुळे त्यांनी नंदनवन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून सोमवार रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.
भुसावळचा पत्ताही खोटा
या प्रकरणातील आरोपीनी याचप्रकारे इतर भूखंड ही बनावट कागदपत्रे तयार करून विकले असावे , असा अंदाज नागपूर पोलिसांनी व्यक्त केला . एका आरोपीविरूद्ध राणाप्रताप नगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल असल्याचे समजते . पाच आरोपी भुसावळ येथील आहे. मात्र त्यांचे पत्ते चुकीचे देण्यात आले आहे . त्यामुळे नंदनवन पोलिसांचे पथक भुसावळ येथे येऊन गेले . मात्र नमूद पत्त्यावर आरोपी सापडले नाही . त्यामुळे पथक वापस गेले आहे .आरोपींनी खोटे पत्ते नोंदवले असावे , असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.



