भुसावळ – अवैध एलपीजी सिलिंडरचा सुरू असलेला ब्लॅक अॅन्ड व्हाईट खुला वापर देशवासियांकरीता अत्यंत धोकादायक असून सुरू असलेला गॅस सिलेंडरचा काळाबाजार गॅस एजन्सीने बंद करून ग्राहकांच्या व नागरिकांच्या जिवाशी खेळणे बंद करावे तसेच घरगुती सिलेंडरला बारकोडिंग QR कोड ट्रॅकिंग सरकारने त्वरित लागू करावे अशी मागणी ग्राहक दक्षता कल्याण फाउंडेशच्या महिला संघटिका मेघा शर्मा यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केली . ग्राहकांच्या जनजागृती बाबत ग्राहक दक्षता कल्याण फाउंडेशन या स्वयंसेवी स्वंस्थेच्या वतीने पाऊल उचलण्यात आले असून ग्राहकांचे हित, मान-सन्मान व सामाजिक कार्याकरीता नेहमीच ही संस्था तत्पर राहते. पत्रकार परिषदेला , जनसंपर्क अधिकारी क्रीष्णा पवार व रोहीत पवार, अंकुर वासावा उपस्थित होते . गॅस सिलेंडरच्या गैरव्यवहारा बाबत बोलतांना त्या म्हणाल्या की , संस्थेच्या माध्यमातून आम्ही वारंवार ही गंभीर बाब प्रशासनाच्या लक्षात आणून देत असतो मात्र याकडे दुर्लक्ष केले जाते , महसूल प्रशासनाने सुद्धा अवैध गॅस रिफिलिंग कडे कानाडोळा केला असून आम्ही तक्रार करतो मात्र दुर्लक्ष केले जाते असा आरोपही यावेळी त्यांनी केला आहे . सिलेंडरच्या qr कोड ट्रॅकिंग साठी एक प्रायोगिक अभ्यास इंडियन ऑइल कॉर्पोरेशन iocl द्वारे मदानपूर खादर बोटलींग प्लांट दिल्ली येथे किंवा कोडेड एलपीजी सिलेंडर भरण्यासाठी आणि दिल्ली मार्केटच्या दोन वितरकाना पाठविण्यासाठी हाती घेण्यात आला आहे गॅस सिलेंडरची चोरी , ट्रॅकिंग , आणि ट्रेझिंग उत्तम यादी व्यवस्थापन या समस्यांचे निराकरण करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे . असेही त्या म्हणाल्या. भुसावळ शहरासह जळगाव जिल्ह्यात अवैध गॅस , गॅस चोरीचे प्रमाण वाढले असून घरगुती वापराचा गॅस वाहनांसाठी सर्रासपणे वापरण्यात येत आहे मात्र संबंधित अधिकारी याबाबत कोणतीच कारवाई करीत नसल्याचे दिसून येत आहे ,.घरगुती गॅस सिलेंडर वापराची संख्या कमी आहे त्यात वन प्लस वन मुळे सर्व सिलेंडर वापरले जात नाही व गॅस सिलेंडरचा काळा बाजार होतो . वाहन संख्या वाढत आहे मात्र गॅस अँटो एलपीजीचा खप दिवसेंदिवस कमी होत चालला आहे व पंप सुद्धा कमी आहेत . अवैध प्रकारे घरगुती गॅस सिलेंडर एलपीजी वाहणात मोठ्या प्रमाणात वापरण्यात येत आहे . व्यावसायिक सिलेंडर महाग आहे म्हणून घरगुती गॅस सिलेंडर चोरून वापरतात याकडे प्रशासन दुर्लक्ष करीत आहे .यामुळे अनेक संभाव्य धोखे वाढले असून अपघात सुद्धा होत असतात तरी प्रशासनाने याकडे त्वरित लक्ष द्यावे व गॅसचा ( अवैध ) काळा बाजार थाबवावा बरकोडिंग क्यूआर कोड ट्रॅकिंग त्वरित लागु करावे असे सांगून अवैध वापरातील एलपीजी सिलेंडरचा वापर धोकादायक असल्याची सविस्तर माहिती दिली .




